जागतिक व्याघ्र दिन एकाचा मृत्यू, एक जेरबंद तर एकाने केला हल्ला

वाघाच्या 3 घटना

News34 tiger chandrapur

चंद्रपूर – जागतिक व्याघ्र दिनी चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या 3 घटना उघडकीस आल्या, एका घटनेत वाघाने एकावर हल्ला करीत जखमी केले तर एका वाघाचा मृतदेह तर एक वाघ जेरबंद करण्यात आला.

पोम्भूर्णा तालुक्यातील गावात काही दिवसांपासून जनावरांवर वाघांचे हल्ले वाढत असल्याने परिसरातील नागरिकांनी त्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाला केली होती.

नागरिकांच्या मागणीवर आज वनविभागाने त्या वाघाला जेरबंद केले असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.

दुसऱ्या घटनेत बल्लारपूर तालुक्यातील कळमना वन क्षेत्रात मादी वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती, वाघिणीचा मृतदेह ट्रान्झिट सेंटर मध्ये शवविच्छेदन साठी नेण्यात आला.

मूल तालुक्यातील बेलघाटा गावाजवळ 55 वर्षीय गुराखी सेवक कोवे हा गुरे चराई साठी जंगलात घेऊन गेला असता वाघाने त्याच्यावर हल्ला केला, या हल्ल्यात कोवे जखमी झाला आहे.