चंद्रपूर : सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई शांताराम पोटदुखे यांचे निधन

चंद्रपूर 6 जून – माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या पत्नी तथा सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरच्या अध्यक्ष सुधाताई शांताराम पोटदुखे यांचे गुरुवारी पहाटे नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८५ वर्षांच्या होत्या.

गेल्या काही दिवसांपूर्वी सुधाताई पोटदुखे यांना पक्षाघाताचा अटॅक आला होता. त्यांच्यावर नागपूर येथील ”सेव्हन स्टार” हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा प्रशांत पोटदुखे, मुलगी रिमा, सून रमा, नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

शांताराम पोटदुखे यांच्या निधनानंतर २ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांनी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेली होती. तेव्हापासून सर्वोदय शिक्षण मंडळाची एका यशस्वी दिशेने वाटचाल सुरू झाली होती. त्यांच्या अकस्मात जाण्याने चंद्रपूरच्या शिक्षणाक्षेत्रावर सर्वत्र दुःखद छाया पसरलेली आहे.