जीवघेण्या लोहखदाणींमुळेच नेतेंचा पराभव ?

जीवघेण्या लोहखदाणींमुळेच नेतेंचा पराभव ?

प्रकल्पाला मदत भोवली, किरसान यांना कामागारांचाही मिळाला पाठींबा!

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या वादग्रस्त सुरजागड लोहखनिज पहाडीवरून केले जाणाऱ्या उत्खनन व वाहतुकीला स्थानिक खासदार अशोक नेते, यांचेच सहकार्य असल्याची भावना ग्रामसभांचे कार्यकर्ते, आदिवासी समाज बांधव व नागरिकांमध्ये निर्माण झाली असून लोकसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल तालुके, शहरे, गाव-ग्रामसभाचे प्रतिनिधी व नागरिक एकवटुन काँग्रेस उमेदवार डॉ नामदेव किरसान यांच्या समर्थनात उतरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सव्वा लाखाहुन अधिक घवघवित मताधिक्याच्या फरकाने त्यांनी विजय प्राप्त केला आहे, मात्र भाजपचे अशोक नेते यांचा दारुण पराभव झाल्याचे बोलल्या जात आहे.

लोहखनिज उत्खननामुळे पर्यावरणाचा ग्रास होऊन आदिवासी संस्कृती नष्ट होण्याच्या धोका असून जनसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाल्याची भीती जनसामान्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सातत्याने जणआंदोलने उभारून लोहखनिज उत्खनन व वाहतुकीस प्रखर विरोध नागरिकांकडून दर्शविला जात आहे, मात्र आंदोलकांच्या विरोधाला न जुमानता त्रिवेणी अर्थमूव्हर्स व लॉयलड्स मेटल्स कंपनीकडून कड़क पोलीस सुरक्षेत गेली नऊ वर्षापासून सातत्याने सुरजागड पहाड़ीवरील लोहखनीजाचे उत्खनन व वाहतूक करून इतरत्र उद्योगाला पुरवठा केला जात आहे, सदरचे लोहखनिज वाहतुक दरम्यान कंपनीच्या वाहनाने रस्ता अपघातात शंभहून अधिक सामान्य नागरिकांना आपले जीव गमवावे लागते आहेत, अपघाताच्या घटनात बऱ्याच कुटुंबातील कर्ते पुरुष मरण पावल्याने कुटुंबे उध्दवस्त झालेले आहेत, तसेच काही अपघातग्रस्तांना कायमचे अपंगत्व आल्याचे घटना घडल्या आहेत. लोहयुक्त लाल विषारी धुळीच्या साम्राज्याने शेतकऱ्यांच्या हजारो एक्कर सुपीक शेतजमिनी बंज्जर होऊन जमिनीत पिके घेण्यायोग्य राहिले नाही, नागरिकांसह पशु-पक्षांचे आरोग्य धोक्यात आल्याची तसेच धुळीमुळे वृक्षही करपली जात असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे,   अशा जीवघेण्या लोहखनिज उत्खनन व वाहतूकीच्या विरोधीत संपूर्ण लोकसभा क्षेत्राच्या ग्रामसभा, आदिवासी समाज व स्थानिक नागरिकांकडून वेळोवेळी तिव्र आंदोलने उभारण्यात आली  होती,  मात्र तत्कालीन खासदार अशोक नेते, जिल्ह्यातील तिन्ही आमदार व भाजप तथा सत्ताधारी पक्ष्यांच्या कोणत्याही आदिवासी आमदार व पक्ष पुढाऱ्यांनी आंदोलक नागरिकांना सहकार्य केले नाही, त्यामुळे आदिवासी समाज बांधव व नागरिकांच्या संतापाचा उद्रेक लोकसभा निवडणुकीच्या मतपेटीतून भाजप उमेदवार अशोक नेते यांच्या विरोधात मते टाकून व्यक्त झाल्याचे दिसून आले आहे,

सदरचे लोहखनिज उत्खनन व वाहतुक संबंधात जनसामान्यांच्या भावनांची गंभीर दखल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पडोळे, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व डॉ नामदेव किरसान यांच्या नेतृत्वाने एक वर्षांपूर्वीच घेतली होती, जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलने उभारून प्रश्न शासन दरबारी लावून धरण्याची मौलिक भूमिका बजावली होती, त्यामुळे ग्रामसभा, आदिवासी समाज बांधव व इतर पारंपरिक निवासी मतदारांचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा वाढत गेला, विशेष म्हणजे लोहखनीज उत्खनन कामावरील मजूर व कर्मचारीही काँग्रेस पक्ष व किरसान यांचे पाठीशी खंबीर उभे राहून निवडणूकीच्या प्रचारात उतरल्याचे दिसुन आले होते.
त्यामुळे सुरजागड लोहखनीज उत्खनन व वाहतूकीला ग्रामसभा, आदिवासी समाज बांधव  व इतर नागरिकांच्या विरोधामुळेच अशोक नेते यांचा पराभव झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये दिसुन येत आहे.