खासदार नामदेवराव किरसान यांची ग्वाही,
गडचिरोली;
जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित प्रथम पत्रकार परिषदेतून लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसान यांनी सामाजिक सलोखा, आदिवासी संस्कृतीचे जतन, आरक्षणाचे रक्षण, शिक्षण, आरोग्य, सिंचन, बेरोजगारांना रोजगार निर्मिती अशा सर्व समाज घटक समावेशक विकास प्राधान्यक्रमाने करण्याचे ध्येय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले,
पत्रकार परिषद दरम्यान बोलतांना खासदार किरसान यांनी जिल्ह्याच्या विविध भागातून वाहणाऱ्या नद्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून शेतजमीन सुपीक करण्यावर भर देणार असल्याचे सांगून, शेतीचे उत्पादन वाढले की शेतकरी सुखी होतो, आणि शेतकरी सुखी झाला तर संपूर्ण समाज समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले, आरक्षणाचे रक्षण, शिक्षण, आरोग्य, सिंचनाच्या सोयी, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची योग्य संधी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची हमी किरसान यांनी यावेळी दिली,
पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलतांना मूलभूत विकास साधतांना वनकायद्याच्या जाचक अटींमुळे विकास कामात अडचणी येतात, मात्र सुरजागड लोहखनिज उत्खनन कामात वनकायद्यात काही प्रमाणात लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीला अलिखित व अघोषित शिथिलता देण्यात आली असल्याचा संशय डॉ किरसान यांनी व्यक्त केला, वनकायद्यामुळे इतर प्रकारे जिल्ह्याच्या विकासातील बाधा कसा दूर करता येईल यावर लोकसभेत प्रयत्न करणार असल्याचेही खासदार किरसान यांनी सांगितले, यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास राऊत, काँग्रेस महिला आघाडीच्या कुसुम आलाम, शहर अध्यक्ष सतीश विधाते व कॉग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.