विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार पोहचले खरगेंच्या भेटीला,

खासदार किरसान, जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडेंची प्रामुख्याने उपस्थिती,

दिल्ली;
लोकसभा निवडणुक प्रचाराच्या रणधुमळीतून उसंत मिळाल्या नंतर महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाला घवघवीत यश संपादनातील प्रमुख नेते राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेता विजय वड्डेटीवार व गडचिरोली लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसान हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्ली येथे भेट घेतली आहे.

यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आमदार वड्डेटीवार यांनी महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्ष बळकटीसाठी विविधांगी विकास योजना राबविण्याची व काँग्रेस पक्षाच्या ध्येय्य धोरणावरील नागरिकांच्या विश्वास वृद्धिंगत करण्याची आवश्यकता असल्याचे चर्चेतून सांगितले, खासदार किरसान यांनी आदिवासी बहुल अतिमागास गडचिरोली जिल्ह्याच्या प्रगतीसाठी विशेष सहकार्य मिळण्याची विनंती काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्याकडे केली आहे. खासदार किरसान यांच्या विनंतीला खरगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.