सोनिया व राहुल गांधींकडून ब्राम्हणवाडेंच्या कार्याचे कौतुक,

ब्राह्मणवाडेंना विधानसभा उमेदवारी मिळण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा!

गडचिरोली;
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या कणखर नेतृत्वाने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने दहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भाजपचे अशोक नेते यांचा पराभव करून डॉ नामदेव किरसान यांचा घवघवीत मताधिक्याने विजय संपादित झाला आहे. ब्राम्हणवाडे यांच्या कार्याची दखल काँग्रेस संसदीय दल अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी व काँग्रेस पक्ष श्रेष्टीने घेतली असून त्यांच्या कर्तृत्वाने भारावून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून पुढील वाटचालीस भरभरून सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी गेली तीन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे, दरम्यानच्या काळात त्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, उद्योग, बेरोजगारी, रस्ते, भौतिक व मूलभूत सोयीसुविधाच्या समस्यांवर आंदोलने उभारून शासन व प्रशासन स्तरावर आवाज उठवून नागरिकांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यातल्या लढवय्या नेतृत्वामुळे मागील दहा वर्षात जिल्हा काँग्रेसमधील मरगळ दूर होऊन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले, नागरिकांच्या समस्यांकडेही शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले गेले, त्यामुळे मतदारांमध्ये काँग्रेस पक्षावरचा विश्वास वाढत जाऊन दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काँग्रेसला गडचिरोली-चिमूर लोकसभेत घवघवीत यश संपादन करता आले आहे. दिल्ली येथे महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी घेतलेल्या काँग्रेस संसदीय दल अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे व खासदार राहुल गांधी यांच्या भेटीच्या वेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार डॉ नामदेव किरसान व आमदार सुभाषभाऊ धोटे प्रामुख्याने उपस्थित होते, यावेळी पक्ष श्रेष्टींनी महेंद्र ब्राह्मणवाडे यांचेकडून भविष्यात पक्षवाढीसाठी भरीव कार्य व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील असे आश्वासन देण्यात आले, महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या कर्तृत्वावर केंद्रीय नेतृत्व खुश असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, त्यामुळे आता प्रदेश कॉंग्रेस नेतृत्वानेही ब्राम्हणवाडे यांच्या कुशल व कर्तृत्ववान नेतृत्वाची दखल घेऊन आगामी विधानसभेच्या चंद्रपूर जिल्ह्यातुन उमेदवारी निश्चित केली जाण्याची उत्सुकता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाढली आहे,