दुचाकी अपघातात युवक गंभीर जखमी,

जगदंब फाउंडेशनच्या मदतीने उपचार,

सिरोंचा;(जिल्हा गडचिरोली)
तालुक्यातील धर्मपुरी गावाजवळ स्वतःची दुचाकी घसरून पडल्याने राजबाबू मेकाला (वय 35) हा युवक गंभीर जखमी झाला आहे, त्याला वेळीच जगदंब फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मदत करून उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे जखमी राजबाबू मेकाला याचे प्राण वाचले आहे.

राजबाबू मेकाला हा (ता.११) मंगळवारी सायंकाळी पाच वाजता दरम्यान सिरोंचा वरून चिंतलपल्ली गावाकडे स्वतःच्या दुचाकी वरून जात होता, खराब रस्त्यामुळे अचानक दुचाकी खड्ड्यात जाऊन घसरून पडली, यात राजबाबू पडून गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती जगदंब फाउंडेशनच्या सदस्यांना मिळताच त्यांनी राजबाबू याला फाउंडेशनच्या अम्ब्युलन्स व्यवस्थेने सिरोंचाच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जगदंब फाउंडेशन कार्यकर्त्यांमुळे अपघातग्रस्त राजबाबू मेकाला याला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले असून पुढील उपचार ग्रामीण रुग्णालयात केले जात आहे. त्यामुळे राजबाबूचे नातेवाहिक व नागरिकांनी जगदंब फाउंडेशनचे आभार मानले आहे.(ता.प्रतिनिधी)