मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे खासदार डॉ किरसान यांचे निर्देश,

महंत मुरलीधर महाराज यांच्या आंदोलनाची दखल!

चामोर्शी; (जिल्हा गडचिरोली)
तालुक्यातील मार्कंडा येथील प्रसिद्ध विदर्भाची काशी म्हणून ओळखली जाणाऱ्या मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी हरणाघट पिठाचे महंत मुरलीधर महाराज हरणघाट पीठ यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी सत्ताधारी पक्षांच्या आमदार व खासदार यांनी जिर्णोद्धाराचे आश्वासन दिल्याने मुरलीधर महाराज यांनी उपोषण आंदोलन मागे घेतले होते, त्यानंतर मात्र जीर्णोद्वाराचे बांधकाम तसूभरही झाले नाही. ही बाब माजी खासदार मारोतराव कोवसे यांनी नवनिर्वाचित खासदार नामदेवराव किरसान यांच्या लक्षात आणून दिली, त्यामुळे खासदार किरसान यांच्या आयोजित बैठकीत पुरातत्व विभागाला मंदिर जिर्णोद्धार बांधकाम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

मार्कंडेश्वर मंदिरात मंदिरात खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकी वेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश युवक काँग्रेस एड विश्वजित कोवासे, संत मुरलीधर महाराज, राजेश ठाकुर पर्यावरण सेल चे जिल्हा अध्यक्ष, नगरसेवक नितीन वायलालवार, उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, माजी जी.प.सदस्य कविता भगत, नगर सेवक सुमेध तुरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, अशोक पोरेड्डेवार, तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, संजय वड्डेटीवार, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, अमर मोगरे, चंदू मरसकोल्ले, तालुका अध्यक्ष प्रफुल बारसागडे, नेहाल आभारे, तेजस कोंडेकर, माजी प.स. सदस्य धर्मशिला साहारे, मुखरू शेंडे, मनोज हेजीब मार्कंडेश्वर भाविक, भारतीय पुरातत्व खात्याचे अधिक्षण पुरतस्तविध अरुण मल्लिक , संरक्षण सहाय्यक शुभम कोरे आदी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ नामदेव किरसान यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जिर्णोद्धाराचे बांधकाम कार्यप्रणालीवर नापसंती व्यक्त केली असून रखडलेले बांधकाम त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.
यावेळी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक यांनी बांधकाम पूर्ण करण्यास एक महिन्याचा अवधी देण्याची विनंती खासदार किरसान यांच्याकडे केली आहे. त्यामुळे पुढील एक महिन्यात मार्कंडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्या जाण्याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. (ता.प्रतिनिधी)