जवाहर वार्डात धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करा,

सपा जिल्हाध्यक्ष इलियाज खान यांची वनविभागकडे मागणी.

देसाईगंज-वडसा; (जिल्हा गडचिरोली)
शहरातील जवाहर वार्ड, कमलानगर व जुनी वडसा रोड परिसरात बिबट्याच्या धुमाकूळाने नागरिक त्रस्त झाले आहेत, त्यामुळे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करून बंदोबस्त करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियाज पठाण यांनी वनविभागाकडे केली आहे.

जवाहर वार्डाला लागून इटीयाडोह पाठ्बंधारे विभाग व जिल्हा परिषद जलसंधारण विभाग चे कार्यालये असून परिसरातील खुल्या जागेत लांब उंचीची घनदाट वृक्ष आहेत, त्यामुळे बिबट्याने या ठिकाणी आपले बस्तानं मांडल्याचे बोलल्या जात आहे.

गेली काही दिवसात परिसरातील कुत्रे व पाळीव प्राण्यांना बिबट्याने आपले भक्ष्य बनविले असून दिवसेंदिवस बिबट्याचा उद्रेक वाढत आहे, काही दिवसांपूर्वी झेंन लॉन परिसरातही बिबटयाचा वावर असलेले सि्सिटिव्ही चित्रीकरण प्रसार माध्यमावर फिरले होते, आता जवाहर वार्डातील काही नागरिकांनी परिसरात बिबट असल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहे, त्यामुळे जवाहर वार्ड, कमलानगर व परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली असून बिबट हिंसक होऊन नागरी वस्तीतील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सदरच्या बिबट्याला जेरबंद करून
योग्य बंदोबस्त करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदनातून केली आहे,