लघुशंकेसाठी थांबलेली पत्नी सुदैवाने बचावली,
एटापल्ली; (जिल्हा गडचिरोली)
तालुक्यातील उडेरा-बुर्गी गावाजवळ रस्त्यावरून स्वतःच्या दुचाकीने प्रवास करताना नेवलु मासू गावडे (वय ४०) राहणार पुरसलगोंदी यांच्या चालत्या दुचाकीवर अवाढव्य वृक्ष कोसळल्याने ते जागीच ठार झाले आहे. तर पत्नी पोवरी नेवलु गावडे ही काही अंतरावर लघुशंकेसाठी दुचाकीवरून खाली उतरल्याने थोडक्यात बचवती,
नवलु गावडे व पत्नी पोवरी हे दोघे (ता.१४ जून) शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता दरम्यान पुरसलगोंदी गावावरून एका लग्न समारंभासाठी करपनफुंडी गावी एम एच ३३ ए इ ६२८२ क्रमांकच्या दुचाकीवरून जात होते, त्यावेळी उडेरा ते बुर्गी गावाच्या मध्ये पोहचले असता अचानक वादळ वाऱ्यासह पाऊस पडायला सुरवात झाली, वाटेतच पत्नी पोवरी लघुशंकेसाठी दुचाकीवरून खाली उतरली, नेवलु मात्र जरा पुढे जाऊन थांबण्याच्या बेतात असतांनाच जोरदार झालेल्या वादळात रस्त्याच्या कडेचा वृक्ष नेवलु चालवीत असलेल्या दुचाकीच्या मधोमध नेवलु बसल्या ठिकाणी यांच्या कमरेवर कोसळले, अवाढव्य वृक्ष अंगावर कोसळून नेवलुचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेच्या माहितीवरून बुर्गी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे पाठविला आहे, मृत्यू पश्चात नेवलु गावडे यांना पत्नी, दोन मुली, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे, वृक्ष कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात नेवलु गावडे यांना नाहक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शासनाने नेवलुच्या परिवाराला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी नातेवाहिक व नागरिकांनी केली आहे.