विरोधी पक्षनेते वड्डेटीवार यांचा खळबळजनक रौप्यस्फोट!
मुंबई;
राज्य विधिमंडळाचे जेष्ठ मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ गेल्या काही कालावधीपासून नाराज असल्याची चर्चा असून भुजबळ यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती. मात्र महायुतीमधील अंतर्गत वादामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नसून ते सुरवातीपासूनच भाजप सोबत जाण्यास इच्छुक ननव्हते असा खळबळजनक रौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी एका मुलाखतीतून केला आहे.
त्यानंतर झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील भुजबळ यांनी आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे भुजबळ आणखीनच नाराज असल्याचं बोलले जात आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी तसा एका मुलाखतीमध्ये देखील अनेक गौप्यस्फोट केले होता. त्यामुळे दुसऱ्या दिवसांपासून राज्यातील नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विधिमंडळ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी छगन भुजबळ यांच्या बद्दल बोलतांना त्यांची अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी होण्याची मुळीच इच्छा नसल्याची त्यांनी त्यांना हे खासगीत सांगितले असल्याचा गौप्यस्फोट वडेट्टीवार यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“वरिष्ठ असूनही छगन भुजबळ यांना पक्षात सातत्याने डावलण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटात ज्यांना जे मिळेल ते ओरबाळून पद्धत सुरू आहे. हे सरकार आता कमिशन खोर झाले की काय? असा प्रश्न नागरिकांना पडत असल्याचे वड्डेटीवार म्हणाले आहेत.
तसंच पुढे ते म्हणाले की, सत्ता, संपत्तीच्या लोभात अनावश्यक साहित्य खरेदीचा सपाटा सरकारने लावला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. इच्छा नसतांना भुजबळ भाजपसोबत गेले, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असेल तर भुजबळ वाघ आहेत. त्यांच्या भुजामध्ये बळ आहे, त्यांनी ते दाखवून देण्याची खरी वेळ आली आहे, आता एक घाव दोन तुकडे करण्याची संधी भुजबळ यांनी सोडू नये असा सल्लाही वड्डेटीवार यांनी दिला आहे, कुरकुर करण्यापेक्षा कुरघोडी करण्याची आवश्यकता असल्याचा टोला देखील वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला आहे.
त्यामुळे विरोधी पकधानेते विजय वड्डेटीवार यांच्या या खळबळजनक वक्तव्याचा राज्याच्या राजकारणात आगामी काळात काय परिणाम होतो, याकडे राजकीय विश्लेषक, राजकीय पक्ष, सामाजिक विचारवंत व जनतेचे लक्ष लागले आहे.