चपराश्याचा मुलगा झाला, जागतिक कीर्तीचा साहित्यिक,

डॉ सूरज एंगडे यांना साहित्य अकादमीचे नामांकन!

नांदेड; (जयभीम नगर)
येथील एका टीन पत्र्याच्या घरात बालपण घालवलेला, वडील बँकेत चपराशी, विद्यार्थी दशेत शेतात मजुरीचे कामे, ट्रकवर हेल्पर, व मिळेल ते मोल मजुरीची कामे केलेला तल्लख बुद्धीचा तरुण सुरज एंगडे यांना साहित्य अकादमीचे नामांकन मिळाले आहे, ही बाब नांदेडकर नागरिकांचा गौरव वाढवणारी आहे.

सूरज एंगडे हा जेमतेम 35 वर्षे वयाचे असून त्याचा देशातील पहिल्या 25 प्रभावशाली तरुणांमध्ये समावेश झाला आहे. सूरजने आशिया, आफ्रिका, युरोप व उत्तर अमेरिका या चार खंडातून शिक्षण घेतले आहे. सुरज यांचेवर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आहे, त्याने हॉवर्ड विद्यापीठात संशोधण केले आहे. आता तो अमेरिकेतील बोस्टनमधील हॉवर्ड या विद्यापीठात पोस्ट-डॉक फेलो म्हणून काम करत आहे.

भारतातील आघाडीचा विचारवंत म्हणून सुरजची ख्याती आहे. त्याचे शंभर पेक्षा जास्त लेख व पुस्तक समीक्षा विविध प्रिंट माध्यमातून प्रकाशित आहेत. सण २०१९ मध्ये सुरजला कॅनडा सरकारने डॉक्टर आंबेडकर जस्टीस अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे. तसेच भारताचा साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठ्या साहित्य अकादमी या पुरस्कारासाठी त्याचे नामांकन स्वीकारण्यात आले आहे. सूरज हा आफ्रिकेतील विद्यापीठातून पीएचडी मिळवणारा पहिला दलित तरुण ठरला आहे.

सूरज चे कास्ट मटर्स हे पुस्तक पेंगविन (Penguin) प्रकाशनाने प्रकाशित केले असून बेस्ट सेलर ठरलं आहे. या पुस्तकाच्या पहिल्यांदा छापलेल्या प्रती अल्पावधीतच विकल्या गेल्या होत्या, त्यामुळे दुसर्‍यांदा हे पुस्तक प्रिंट केले जात आहे. आजच्या तरुण पिढीसाठी सूरज एंगडे हा युवक आदर्श साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळवत असल्याचे दिसून येत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)