केंद्र व राज्य सरकारच्या जन विरोधी धोरणांवर काँग्रेस आक्रमक,
गडचिरोली;
जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायकारक, विषमतावादी व जनविरोधी धोरणांविरुद्ध सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर चिखल फेकून, चिखल फेको आंदोलन केले जाणार असल्याचे गडचिरोली शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते व तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंत राऊत यांनी संयुक्तरित्या काढलेल्या प्रसिद्ध पत्रातून कडविले आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या जन विरोधी धोरणांच्या विषेधार्थ जिल्हा काँग्रेस आंदोलनाचे हत्यार उपसून आक्रमकतेने मैदानात उतरल्याने दिसून येत आहे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार स्थानिक इंदिरा गांधी चौकात (ता.२१जून) शुक्रवारी दुपारी तीन वाजता दरम्यान खासदार डॉ. नामदेव किरसान व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जात आहे. केंद्रातील मोदी यांचे सरकार व राज्यातील शिंदे यांचे सरकार या दोन्ही शासनाच्या तकलादू व चुकीच्या धोरणाचे सामान्य नागरिक बळी ठरत असून समाजातील सर्वच घटक विविध समस्यांना तोंड देत जीवन जगत आहेत. मात्र, सरकार केवळ वेळकाढुपणाची भूमिका घेता असल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दोन्ही सरकारांच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर चिखल फेकून मारून व चिखल लावून, चिखल फेको आंदोलन करण्यात येणार आहे. सदरच्या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्ये व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आवाहन सतीश विधाते व वसंत राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रातून केले आहे.