राज्य पणन संचालकांच्या आदेशाने सहकार क्षेत्रात खळबळ,
चामोर्शी; (जिल्हा गडचिरोली)
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील नियमित कर्मचाऱ्यांना पदोन्नती न देता त्यांच्यावर अन्याय केला गेला असल्याची तक्रार संचालक सुनील भाऊजी कन्नाके यांनी महाराष्ट्र राज्य पणन संचालनालय पुणे यांचेकडे केली आहे, तक्रारीची दखल घेऊन संचालक विकास रसाळ यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पदभरती स्थगितीचा आदेश दिला आहे, त्यामुळे नोकर भरतीत घोळ करणाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे बोलल्या जात आहेत.
कृषी उत्पन्न समितीने गडचिरोली जिल्हा निबंधक यांचे मान्यतेवरून पर्यवेक्षण व सांख्यिकी या पदांसाठी दिनांक १४ जून २०२४ पासून भरती प्रक्रिया सुरू केली आहे, पदभरती करतांना बाजार समितीने नियमांचे पालन न करता मनमानी धोरणाने कृषी कायदा १९६३ चे उल्लंघन केल्याची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुनील कन्नाके यांनी केलेल्या तक्रारी नमूद केले आहे. सदरच्या तक्रारीची दखल घेऊन (ता.२१ जून) शुक्रवारी राज्य संचालनालय संचालक विकास रसाळ यांचेकडे झालेल्या सुनावणीत भरती प्रक्रिया राबवतांन नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत व भरती प्रक्रिया राबवतांन कार्यप्रणालीत विसंगती आढळून येत असल्याचे निरीक्षण नोंदवून सदरची भरती प्रक्रिया पुढील आदेशपर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत घोळ करून आपले हात काळे करणाऱ्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती व्यक्त केली जात असून पणन संचालनालयाच्या पुढील कारवाहिकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वरील प्रकरणावर भाजप सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष नगरसेवक आशिष पिपरे यांनी जनकत्व न्युज नेटवर्कशी बोलतांना एका स्वयंघोषित सहकार महर्षिने पदभरती प्रक्रियेत उमेदवारांकडून भ्रष्टमार्गाने दोन करोड रुपयांची माया गोळा केली असल्याचा आरोप केला, असून भरती प्रक्रिया प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर करवाहीची मागणीही त्यांनी केली आहे.