जहाल नक्षली दांपत्य गिरीधारी व संगीताचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण,

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संविधान पुस्तिका भेट देऊन स्वागत व सत्कार!

गडचिरोली;
जिल्ह्यात गेली सत्तावीस वर्षांपासून धुमाकूळ घालणारा जहाल नक्षली गिरधारी उर्फ नानसु मनसू तुमरेटी व त्याची पत्नी संगीता उर्फ ललिता चैतु उसेंडी या नक्षल दाम्पत्याने उपमुख्यमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष गडचिरोली पोलिसांपुढे (ता.२२ जून) शनिवारी आत्मसमर्पण केले आहे, त्यामुळे आधीच कमकुवत झालेल्या नक्षल चळवळीला पुन्हा मोठा हादरा बसल्याचे बोलल्या जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मसमर्पीत नक्षल दांपत्ये गिरधारी व संगीता यांना भारतीय संविधान पुस्तिका भेट देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या मुख्य प्रवाहात प्रवेशाचे स्वागत केले आहे, यातून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंसक कारवाया करणाऱ्या नक्षल्यांना हिंसाचाराच्या मार्गाचा त्याग करून प्रगत, प्रगल्भ व मानवी हक्क शाबूत राखणाऱ्या लोकशाही मार्गात सामील होण्याच्या मौलिक संदेश यानिमित्याने दिला आहे. हे मात्र निश्चित!

महाराष्ट्र शासनाने आत्मसमर्पण केलेल्या जहाल नक्षली गिरीधारी याला पकडण्यासाठी २५ लाख रुपयाचे तर संगीता हिला पकडण्यासाठी १६ लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम घोषित केली होती, त्या दोघांवर छत्तीसगड शासनानेही लाखो रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते, गिरधारी सन १९९६ मध्ये एटापल्ली दलम सदस्य म्हणून नक्षल चळवळीत सक्रिय झाला होता, तर त्याची पत्नी संगीता ही सन २००६ पासून कसनसूर दलम मध्ये सामील झाली होती, ती सध्या भामरागड दलमची विभागीय सदस्य होती, गिरधारीला सन २००२ मध्ये भामरागड दलम कमांडर म्हणून बढती मिळाली, दरम्यान गिरधारी व संगीता याचे नक्षल दलम मध्ये सक्रिय असतांनाच प्रेम संबंध जुळून लग्न झाले होते, त्यानंतर गिरधारीकच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभागामुळे पुन्हा त्याची बढती होऊन तो गडचिरोली जिल्हा विभागीय सदस्य, कंपनी क्रमांक चारचा उपकामंडर व सन २०१५ मध्ये नक्षल्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य, तसेच पश्चिम विभागाचा सचिव म्हणून त्याने नक्षल चळवळीचे नेतृत्व केले आहे. हिंसाचार घडवून आणण्यात गिरधारी जहालपणे सक्रिय असल्याने तो अल्पावधीतच नक्षल्यांच्या वरिष्ठ कमिटी सामील झाला होता, सन २०११ मध्ये पोलीस व नक्षल चकमकीत नक्षल्यांच्या वरिष्ठ नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या संपूर्ण नक्षल चळवळीची धुरा गिरधारी याच्या खांद्यावर आली होती, गेली सत्तावीस वर्ष हिंसाचाराच्या विविध घटना घडविणारा व नक्षल चळवळीचा मोरक्या गिरधारी व त्याची पत्नी संगीता या जहाल नक्षल दाम्पत्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे,

यावेळी गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल व पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.