माओवाद्यांची प्रसिद्ध प्रत्रक काढून संतापजनक चिथावणी,
गडचिरोली;
जिल्ह्यात सत्तावीस वर्ष धुमाकूळ घालणारा जहाल नक्षली गिरीधर उर्फ बिच्छु उर्फ नानसु मनकू तुमरेटी व त्याची पत्नी संगीता उर्फ ललिता चैतु उसेंडी या नक्षल दाम्पत्याने उपमुख्यमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे, त्यामुळे चिडून जाऊन माओवादी चळवळीचा विभागीय सचिव श्रीनिवास याने दुसऱ्याच दिवशी (ता.२३जून) रविवारी एक संतापजनक प्रसिद्धी पत्रक काढून गिरीधर याला पळपुट्या संबोधून त्याला जनता कधीच माफ करणार नाही असे चिथावले आहे.
प्रसिद्धी प्रत्रकातून दिवंगत नक्षली पेंद्दीशंकर, जोगन्ना, मल्लेश, नर्मदाक्का, सुजनक्का, विकास, भास्कर, संजय, विनू, यांच्या कारकीर्द नक्षल चळवळीसाठी अविस्मरणीय असल्याचा उल्लेख श्रीनिवास याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केला आहे, अशातच नक्षल चळवळ सोडून पळून जाणारा गीरधर हा पहिला नाही व शेवटचाही असणार नाही, असाही उल्लेख प्रत्रकातून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाचे पंचवीस लाख रुपयांचे बक्षीस असलेला तसेच विविध हिंसक घटना घडवून अनेक निष्पाप नागरिकांचा जीव घेतल्याने पोलिसांत १७९ गुन्ह्याच्या नोंदी असलेला जहाज नक्षलवादी गिरीधर हा एटापल्ली तालुक्याच्या कसनसूर पोलीस स्टेशन हद्दीतील जवेली (खुर्द) या गावाचा रहिवासी आहे, त्याला नक्षल चळवळीत राहून हिंसक कारवाया करण्याचा कंटाळा आल्याने त्याने पत्नी संगीता हिचेसह दोन दिवसांपूर्वी (ता. २२जून) शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल व पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले आहे. नक्षल चळवळीचा विभागीय सचिव श्रीनिवास याचे सहीनिशी प्रसिद्ध केलेल्या प्रत्रकातून मात्र गिरीधर याने भयभीत होऊन पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याचे नमूद केले आहे.