पवई, जयभीम नगर अतिक्रमित घरांवरची कारवाही थांबवा!

वड्डेटीवारांची विधानसभेत गर्जना, अधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याची मागणी,

मुंबई;(विधानसभा सभागृह)
येथील पवईच्या जयभीम नगरमधील रहिवासी नागरिकांची कच्ची घरे पाडून अतिक्रमण हटविण्याची कारवाही अन्यायकारक असल्याने सदरची कारवाही थांबवून प्रकरणाची सखील चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी, महानगर पालिका अधिकारी यांच्यावर ऍट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी विधानसभा अधिवेशनातुन केली आहे. तसेच पीडित रहिवासी नागरिकांना त्याच ठिकाणी पक्की घरे बांधून देण्याचीही मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

नियमाने पावसाळ्यापूर्वी कोणत्याही रहिवासी घराचे अतिक्रमण हटविता येत नाही, असे असतानाही पवईच्या जयभीम नगरमध्ये ६०० कुटुंबांची रहिवासी घरे हटविण्याचे काम स्थानिक महानगर पालिकेच्या केले आहे. ही बाब गंभीर असून सरकार गोरगरीब, मागासवर्गीय नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप वड्डेटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्नांवर चर्चा करताना केला आहे,

पालिका प्रशासन कायद्याचा दुरूपयोगाने पोलिस बळाचा वापर करून गरीब, मागासवर्गीय नागरिकांवर अन्याय अन्याय करीत असून गर्भवती स्त्रियांना मारहाण करणे, १४ वर्षाच्या अल्पवयीन बालकांना बेदम मारहाण करणे. अशा अशोभनीय कृती स्थानिक पोलीस प्रशासनाकडून घडल्या गेल्याचा तीव्र संताप वड्डेटीवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून नियमबाह्यरीत्या पोलीस बळ, बुलडोजरच्या साह्याने गरीब, मागासवर्गीय नागरिकांच्या घरांवर केलेली कारवाही मागे घेऊन पीडित नागरिकांचे पुनर्वसन करून त्याच ठिकाणी त्यांना पक्की घरे बांधून देण्याची व हुकूमशाही प्रवृत्तीने कारवाही करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येट्रोसिटी कायद्याने गुन्हे दाखल करून कठोर कारवाही करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी विधानसभेत चर्चेच्या वेळी केली आहे,