गडचिरोली जिल्हा आरोग्य सेवा सक्षमीकरणावर लक्षवेधी,

रूग्णवाहिका अभावी बालक मृत्यूवर वड्डेटीवार संतापले,

मुंबई;(विधानसभा सभागृह)
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या कोरोली गावातील आर्यन अंकित तलांडी या चार वर्षाच्या बाळाला रूग्णवाहिका न मिळाल्याने वेळेत रूग्णालयात पोहचविता आले नाही. त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी विधानसभेत केली आहे.

आर्यन तलांडे या बालकास वेळेवर रूग्णवाहिका मिळाली असती तर त्याचा जीव गेला नसता, गडचिरोलीत जिल्ह्यात आरोग्य विभागाची ७० टक्के पदे रिक्त आहेत, रिक्त पदांमुळे वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर उपलब्द होत नाहीत. रूग्णांना योग्य वेळेत सेवा मिळत नाही. तसेच रूग्णवाहिकेच्या चालकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे असे उपचारा अभावी मृत्यूचे गंभीर प्रसंग घडत असल्याचे वड्डेटीवार यांनी उपस्थित मुद्द्यावर चर्चा करताना सांगितले, त्यामुळे गडचिरोलीतील आरोग्य सेवाच्या गंभीर प्रश्नावर उपयोजना म्हणून आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची कारवाही करण्याची मागणी वड्डेटीवार यांनी सरकारकडे केली आहे.