जेष्ठ नागरिकांच्या संस्काराशिवाय सुसंस्कृत समाज घडणे अशक्य!

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे प्रतिपादन,

देसाईगंज (गडचिरोली)
येथे तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जेष्ठ नागरिकांच्या संस्काराशिवाय सुसंस्कृत समाज घडणे अश्यक्य असल्याचे प्रतिपादन केले आहे.

पुढे बोलतांना देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्य चळवळीत योध्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात व स्वातंत्र्यानंतर देशाला प्रगतीच्या पथावर स्वार होण्यास जेष्ठ नागरिकांचे मौलिक योगदान असून आजही सामाजिक, राजकीय व शैक्षणिक प्रगती साधतांना समाज जेष्ठ नागरिकांच्या सल्ल्यानेच विकासात्मक वाटचाल करीत असल्याचे ब्राह्मणावडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांच्या संस्काराशिवाय सुसंस्कृत समाज निर्माण होणे अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे यांनी समयोचित मार्गदर्शन केले, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य, तालुका काँग्रेस अध्यक्ष, कार्यरकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.