जिल्हा प्रशासनकडून पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा,
गडचिरोली;
जिल्ह्यात गेली सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या व नाल्यांना पूर येऊन वाहतूक प्रभावित झाली आहे, अशावेळी जिल्हाधिकारी संजय दैनी, पोलीस अधीक्षक निलोत्पल व आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी यांच्याकडून हेलिकॉप्टर द्वारे पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यात आला आहे, दरम्यान प्रशासनाकडून पूरग्रस्तांच्या अडचणी लक्ष्यात घेऊन जीवनावश्यक साहित्य सामुग्री पोहोचविण्याचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे.
(ता.२३ जुलै) मंगळवारी जिल्हाधिकारी संजय दैनी, पोलीस अधीक्षक निलोत्पल व आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी यांनी सिरोंचा तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता या दोन्ही नद्यांना आलेल्या पुराची पाहणी केली आहे, यावेळी गोदावरी व प्राणहिता या नद्यांमधून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाण्याच्या विसर्ग संबधी चर्चा करून आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहून सेवा बजावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, जिल्हाधिकारी दैनी यांनी (ता.२०जुलै) शनिवारी धोधो बरसणाऱ्या पावसात आरमोरी, कुंभी, चांदाळा, वडसा व कुरखेडा या भागाचा दौरा करून पुरस्थितीचा आढावा घेतला आहे, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व आपत्ती व्यवस्थापनाची सतर्कता व पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी वेळीच मदत सामुग्रीचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे मागील सहा दिवसांपासून संततधार व मुसळधार पावसाने थैमान घातले असतांनाही जिल्ह्यात फारशी जीवित व वित्तहानी घडल्याच्या घटनांची माहिती पुढे आलेली नाही, हे मात्र विशेष! नागरिकांनीही पाऊस, पाणी व पुराच्या स्थितीचा धोका लक्षात घेऊन स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्याची आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.