जनजीवन विस्कळीत, आरोग्याची समस्या उग्र! अनेकांच्या घरांची पडझड,
गडचिरोली;
जिल्ह्यात गेली एक आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाचा आज (ता. २५) गुरुवारी सकाळी पासून पावसाचा जोर वाढला असून पन्नासहून अधिक मार्गाची वाहतूक बंद झाली आहे, त्यामुळे चारशे ते पाचशे गावांचा जगाशी संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले आहे, संपर्काच्या बाहेर गेलेल्या गावांचा नागरिकांना जीवनावश्यक सामुग्री, अन्नधान्य मिळणे तसेच आरोग्याच्या समस्यांचा धोका निर्माण झाला आहे.
अनेक ठिकाणचे रस्ते पुराच्या पाण्याने वाहून गेली असून शंभरावर अधिक कुटुंबांची घरे कोसळून त्यांची संसार उघड्यावर आली आहेत, वाहतूक बंद असलेले मार्गात प्रामुख्याने चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग शिवणी नाला, पर्यायी मार्ग गडचिरोली पोटेगाव कुनघाडा ते चामोर्शी, आलापल्ली ते भामरागड, पर्लकोटा नदी, कुडकेली नाला व चंद्रा नाला, भामरागड, गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्ग पाल नदी, आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग दिना नदी, आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग, पुसकपल्ली नाला, अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग, वट्रा नाला, मोदुमतूरा नाला देवलमारी नाला, अहेरी, भाडभिडी तळोधी राज्यमार्ग हिवरगाव नाल्यामुळे, चामोर्शी हरणघाट मुल, भामरागड धोंडराज, कवंडे राज्यमार्ग जुवी नाला, एटापल्ली गट्टा रस्ता राज्यमार्ग बांडे नदी अलदंडी गावाजवळ पेंढरी ते पाखांजुर राज्यमार्ग, धानोरा, भेंडाळा लखमापूर बोरी गणपुर अनखोडा रस्ता प्रजिमा, हळदीमाल व कळमगाव नाल्यामुळे चामोर्शी फराळा मार्कडादेव रस्ता प्रजीमा, पर्यायी मार्ग शंकरपुर हेटी मार्कडादेव, झिंगानुर कल्लेड देचलीपेठा, प्रजिमा, मानापुर अंगारा, प्रजिमा, कुरखेडा, गीलगाव पोटेगांव, मुरखडा गुरवडा, गडचिरोली खरपुंडी, गडचिरोली, जोगणा मुरमुरी, माल्लेरमाल खुटेगाव, चामोर्शी, देवापुर पोटेगाव, अमिर्झा मौसीखांब, गडचिरोली, आष्टी इल्लुर, चांदेश्वर टोला ते रशमीपुर, फोकुर्डी ते मार्कडादेव, चामोर्शी, पोटेगाव राजोली, गडचिरोली, कृपाळा गुरवडा, गडचिरोली, चांदाळा, कुंभी, गडचिरोली, दवंडी, खांबाळा, मुस्का, वडसा, शिवराजपुर फरी मोहटोळा, वडसा, आमगाव सावंगी रस्ता ता. गडचिरोली, शिवणी कृपाळा, गडचिरोली क्रिस्टापुर परकाभट्टी, अहेरी, पेठा ते यलाराम, वडसा ते जमभुळगट्टा, अहेरी, घोटसूर कारका, अहेरी सोमनुर मुत्तापूर, जोगनगुडा उमनूर, सिरोचा, करंचा मरपल्ली, अहेरी, सोहले नांदली हेटेलकसा, कोरची, चारभट्टी अंतरगाव, धनेगाव फरी अंगारा, कुरखेडा, चोप कळमगाव, कुरुड, कोंढाळा, देसाईगंज, नागेपल्ली एकनपल्ली, अहेरी, झिंगानूर मंगीगुडम रस्ता मड्डीकडून पोचमार्ग सिरोंचा, जोगनगुडा झिंगानुर अहेरी, बोधनखेडा मार्ग धानोरा, तुंबडीकसा फिरंगे अशा पन्नासहून अधिक गावांची वाहतूक प्रभावित झाली असून नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक साहित्य, सामुग्री मिळण्यास अडचण निर्माण झाली असून आरोग्याच्या समस्यांनीही उग्ररूप धारण केले आहे, त्यामुळे शासन व प्रशासन स्तरावरून मदत पुरविण्याची मागणी केली जात आहे.