स्थापना दिन सप्ताहाच्या पूर्वसंध्येला रक्तरंजित लाल सलामी?
भामरागड;(गडचिरोली)
तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावरील आरेवाडा येथील जयराम कोमटी गावडे (वय ३८) या व्यक्तीची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या केली आहे.
सदरची हत्या नक्षल चळवळीचा स्थापना दिवस २८ जुलै पासून सुरू होणाऱ्या शहिद सप्ताहाच्या पूर्वी संध्येला झाल्यामुळे, तालुक्यात सर्वत्र दहशत पसरली आहे. जयराम गावडे याची ( ता.२५ जुलै) गुरुवारी रात्रीच्या दरम्यान मुख्य रस्त्यावर नक्षल्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केली, व त्याचे शेव रस्त्याच्या मधोमध टाकून नक्षली लाल सलाम जिंदाबादच्या घोषणा देत घटनास्थळावरून पसार झाले आहेत, ही बाब (ता.२६ जुलै) शुक्रवारी पहाटे दरम्यान पादचारी नागरिकांच्या निदर्शनात आली,
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे, माहितीवरून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे केली जात असून, घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.