नक्षल शहीद सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कोरची बाजारपेठ कडकडीत बंद!

अनेक ठिकाणी संमिश्र प्रतिसाद, शेतकरी पोलवा संप पुकारून सहभागी?

गडचिरोली;
जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्याचे ठिकाण कोरची येथील बाजारपेठ नक्षल शहीद सप्ताहाच्या पहिल्या दिवशी (ता. २८ जुलै) रविवारी कडकडीत बंद ठेवण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये नक्षली दहशत कायम असल्याचे बोलल्या जात आहे.

नक्षलवादी संघटनेचे संस्थापक चारू मुजुमदार यांच्या स्मृतीनिमित्त नक्षलवादी दरवर्षी २८ जुलै ते ०३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. सप्ताह साजरा करतांना विविध घटना व आजारपणात मृत पावलेल्या नक्षल्यांना हुतात्मा मानून शहीद स्मारके उभारणी करून अदारांजलीचे कार्यक्रम घेतले जातात, दरम्यान शासकीय विकास कामांची नासधूस, जाळपोळ, रडारवरील राजकीय पुढारी, शासकीय कर्मचारी, अधिकारी, पोलीस खबरी व कंत्राटदारांच्या हत्या अशा हिंसक कारवाया केल्या जातात, यावेळी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी कोरची येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. तसेच एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, धानोरा व कुरखेडा या तालुक्यातील शासकीय विकास कामे, खाजगी वाहतुकदारांनी वाहतूक व शेतकऱ्यांनी आदिवासी परंपरेनुसार पोलवा संप पुकारून नक्षली शहीद सप्ताहाचे समर्थनात उतरल्याची माहिती आहे.बंद आहे.

गेली पाच ते सहा वर्षात पोलिसांकडून शंभराहुन अधिक जहाल नक्षल्याची खात्मा तर तीनशेहून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पण करून घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अशातही नक्षल्याच्या शहीद सप्ताहात कोरची बाजारपेठ बंद पाळल्याने उत्तर गडचिरोली व वाहतूकदार व शेतकऱ्यांनी शेती कामे बंद ठेवल्याने दक्षिण गडचिरोली भागात नक्षली दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पोलिस प्रशासनाकडून जिल्हाभर नक्षल्यांच्या हालचालीवर तीक्ष्ण नजर ठेवली जात आहे.