लाचखोर कनिष्ठ अभियंता अक्षय अगळे अडकला एसीबीच्या जाळ्यात,

एक लाख सत्तर हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक,

धानोरा;(गडचिरोली)
तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पोचमार्गाची सुधारणा केलेल्या कामाचे एमबी रेकार्ड तयार करून देण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला १ लाख ७० हजार रुपयांची लाच मागणारा जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचा कनिष्ठ अभियंता अक्षय मनोहर अगळे (२० वर्ष) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून अटक केली आहे.

बोधनखेडा पोचमार्ग तुमडीकसा, हिरंगे, रेंगेगाव, गोटाटोला, मुरुमगाव, रिडवाही या रस्त्यांची सुधारणा करुन एमबी तयार करून देण्यासाठी कनिष्ठ अभियंता अक्षय अगळे याने तक्रारकर्त्या कंत्राटदारास लाचेची मागणी केली होती, कंत्राटदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता अगळे याने पंचासमक्ष लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अक्षय अगळे याच्यावर धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली आहे.

सदरची कारवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, हवालदार राजेश पद्मगिरवार, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, प्रफुल्ल डोर्लीकर यांनी केली आहे.