ग्रामीण रुग्णालय व नवनिर्मित नर्सेस संघटनेचा सहभाग.
एटापल्ली;(गडचिरोली)
येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोलकाताच्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व खूनाच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदरच्या अत्याचार प्रकरणावर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी व नवनिर्मित नर्सेस संघटनेने (ता. १७ ऑगस्ट) शनिवारी केलेल्या निषेध आंदोलन प्रसंगी शहरातून निषेध रॅली काढून अत्याचारी नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी! आरोग्य विभागाला सक्षम सुरक्षा मिळावी! अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ तूपेश उईके, डॉ ठकसेन, किरण चरडे, अधिपरीचारिका करिश्मा सोनुले, नवनिर्मित नर्सेस संघटना सचिव हर्षा बन्सोड, आरोग्य सेविका शिल्पा बुटले, ग्लोरिया डॅनियल, जयश्री डावरे, प्रवीण कदम, गणेश हवालदार, ज्योती पुलगम, बोधनकर, झाडे, वड्डे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, नर्सेस संघटना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाली होते. (जनकत्व न्युज नेटवर्क)