आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात गडचिरोली जिल्ह्यात कडकडीत बंद,

विविध राजकीय पक्ष, संघटनांनी राष्ट्रपती मुर्मु यांना पाठविले निवेदन,

गडचिरोली;
अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेयर लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्हाभरात कडकडीत बंद पाळून आरक्षणातील उपवर्गीकरण व क्रिमिलेअर लागू करण्यात येऊन नये यासाठी भारत बंद आंदोलनात सहभागी होऊन मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मु यांना पाठविण्यात आले आहे.

गडचिरोली शहराच्या मुख्य बाजारपेठेसह चामोर्शी, मुलचेरा, देसाईगंज व कुरखेडा या तालुक्यांच्या मुख्य बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेऊन तर एटापल्ली, अहेरी, भामरागड, आरमोरी, धानोरा, कोरची व सिरोंचा या तालुक्यांमध्ये धरणे आंदोलन उभारून तहसीदारांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना उपवर्गीकर्णाच्या विरोधाचे निवेदन पाठविण्यात आले आहे. शेकडो वर्षांपासून मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेलेला, आजही सामाजिक विषमतेचे चटके सोसत असलेला, अनुसूचति जाती व अनुसूचित जमाती या समाजाच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण झाल्यास समाजात फूट पडून समाजाच्या मागासलेपणात वाढ होऊन, समाज पुन्हा गुलामगिरीत ढकलले जाण्याची भीती निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची तसेच केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश मागे घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, अॅड.राम मेश्राम, प्रा. भास्कर मेश्राम, मुनिश्वर बोरकर, विलास कोडापे, गुलाबराव मडावी, नगरसेवक मनोहर बोरकर, राज बन्सोड, नागसेन खोब्रागडे, नगरसेवक निजन पेंदाम, विनोद मडावी, आनंद कंगाले, तुळशीराम सहारे, नगरसेवक किसन हिचामी, हंसराज दुधे, कुणाल कोवे, मिलिंद बाबोंळे, नगरसेवक राहुल कुळमेथे, मंदीप गोरडवार, नरेश महाडोरे, अंकुश कोरामी, सुरेश कन्नमवार, सुधीर वालदे, स्वानंद मडावी, गुरुदास सडमेक, विद्या कांबळे, रेखा कुंभारे, कुसुम आलाम, भारती मडावी, ममिता हिचामी, मालती पुडो, आरती कोल्हे, विद्या दुगा, मीनल चिमूरकर, सुखदेव वासनिक, योग्यश नागभीडकर, प्रभाकर कांबळे, प्रशांत गोटा, अरविंद वाळके, प्रफुल्ल आंबोरकर,भीमराव देवतळे, एकनाथ रामटेके, शुभम रापंजी, सुभाष खोब्रागडे, ब्रह्मानंद पुंगाटी, शशिकांत तेलामी, धर्मानंद मेश्राम, लोकनाथ गावडे, विनोद मडावी, खुशाल सिडाम, नागसेन खोब्रागडे, प्रितेश अंबादे, चेतन दुर्गे, दत्तू उसेंडी, संजय कोठारी, नरेश मुन, जयंत गजभिये, कांता कांबळे, शांता नेवरापोडना, निलेश रामगिरवार, रमेश उईके, देवाजी मडावी, रामू मट्टामी, नरेश नरोटे, पुरुषोत्तम रामटेके व बहुसंख्य नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.