करपनफुंडी वृद्ध दाम्पत्य हत्या प्रकरणातील बेपत्ता पतीचा मृतदेहच लागला हाती.

मालमत्तेच्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा कयास, पाच संशयित ताब्यात,

एटापल्ली;(गडचिरोली) तालुक्यातील करपनफुंडी येथील वृद्ध महिला बुर्गो रैनु गोटा (वय ५५) हिची जादूटोण्याच्या संशयावरून हत्या करून तिचा मृतदेह जवळच्या नदीत फेकून देण्यात आला असून तिचा पती रैनु जंगली गोटा (वय ६०) हा बेपत्ता होता, त्याचीही हत्या झाली असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला होता. आज (२८ ऑगस्ट) बुधवारी सायंकाळी दरम्यान रैनु गोटा यांचा मृतदेहच नातेवाहिकांच्या हाती लागला असून या दोघांचीही हत्या मालमत्तेच्या वादातून झाल्याच्या कयासावरून पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

गेल्या (ता. २४ ऑगस्ट) शनिवारपासून रैनु व बुर्गो हे वृद्ध दाम्पत्य शेतातील झोपडीतून बेपत्ता झाले होते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीयांकडून दोघांचाही शोध घेतला जात होता. (ता.२७ ऑगस्ट) मंगळवारी सकाळी दहा वाजता दरम्यान जांबिया नाला व बांडे नदीच्या संगमावर बुर्गो गोटा यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला होता. तर आज ( ता. २८ ऑगस्ट) रैनु गोटा यांचा मृतदेह त्याच ठिकाणापासून काही अंतरावर नातेवाहिकांकडून शोध घेतांना आढळून आला आहे.

सुरवातीला मृत बोर्गो गोटा व बेपत्ता रैनु गोटा या वृद्ध दाम्पत्याची जादूटोण्याच्या संशयातून हत्या झाल्याचा संशय नातेवाहिकांनी व्यक्त केला होता. मात्र सदरच्या हत्या मालमत्तेच्या वादातून झाली असल्याचा कयास पोलिसांकडून लावला जात होता. घटनेचा पुढील तपस जादूटोणा अथवा मालमत्ता या दोन्ही संशयित बाजू पडताळून केला जात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले आहे.