चोरट्याने बँकेतून उडवली बारा हजार रुपयांची रोकड,

गर्दीतील वृद्धाच्या पिशवीतून काढली रक्कम, घटना सीसी टिव्हीत कैद,

एटापल्ली;(गडचिरोली)
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत खातेदार ग्राहकांच्या गर्दीचा फायदा उचलून दिवसाढवळ्या एका अज्ञात चोरट्याने वृद्ध इसमाची १२ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. सदरच्या चोरीची घटना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अज्ञात चोराचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

गेल्या आठवड्यात केंद्र शासनाच्या पीएम किसन योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात व राज्य शासनाच्या ‘लाडकी बहीण योजने’ अंतर्गत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे बँकांमध्ये खातेदारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक जण ईकेवायसी व खात्यात जमा झालेली रक्कम काढण्यासाठी बँकेत गर्दी करीत आहेत. याच गर्दीचा फायदा चोरट्यांकडून घेतला जात आहे. (ता. २७) मंगळवारी एका वृद्ध व्यक्तीने सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेतून बारा हजार रुपयांची रक्कम काढून आपल्या पिशवीत ठेवली होती, पूर्वीपासूनच नजर ठेवून असलेला चोरट्यांने बँकेच्या काउंटर समोरच या वृद्ध व्यक्तीच्या पिशवीतून ती १२ हजार रुपये लंपास करून चोरटा पसार झाला आहे.

सदरच्या घटनेमुळे स्थानिक बँक परिसरातील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बँकेतील सीसी टीव्ही फुटेज तपासून चोरट्याकडून चोरी करतांनाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायलर केला असून, पोलिसांकडून चोरट्याचा कसून शोध घेतला जात आहे.