भोवळ येऊन खाली कोसळल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू,

एक आठवड्यापासून तापाने फणफनत होता, योग्य उपचार न मिळाल्याने ओढवले मरण.

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील चंदनवेली येथील शत्रू मंगा कुळयेटी (वय ५५ वर्ष) या शेतकऱ्याचा भोवळ येऊन खाली कोसळल्याने मृत्यू झाला आहे. एक आठवड्यापासून तापाने फणफनात असतांना योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने शत्रू यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या शेतीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना कोणतीही सवळ मिळत नाही. अशातच शत्रू कुळयेटी या शेतकऱ्यांला एक आठवड्यापासून कणकण वाटून ताप येत होता, त्याने गावातच प्राथमिक उपचार घेऊन औषधोपचार घेतला होता, मात्र शरीरातील ताप काही कमी होत नव्हता, शत्रू कुळयेटी हे नेहमी प्रमाणे शेतावर कामाला जाण्याच्या बेतात असतांना (ता.०२ सप्टेंबर) सोमवारी सकाळी आठ वाजता दरम्यान त्यांना राहते घरीच भोवळ आली, व ते जमिनीवर खाली कोसळले, ही बाब नातेवाहिकांच्या लक्षात आली, नातेवाहिकांनी लागलीच खाजगी वाहनाने शत्रू यांना ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचारार्थ घेऊन येण्याची व्यवस्था केली होती, मात्र शत्रू कुळयेटी हे रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांचा वाटेत मृत्यू झाला आहे. मृत्यू पश्चात त्यांना पत्नी, एक मुलगा, पाच मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबला शासकीय मदत देण्याची मागणी केली जात आहे.

घटनेच्या माहितीवरून पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात येऊन अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाहिकांना सुपूर्द करण्यात आला आहे. पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे.