दिवंगत कॉम्रेड सीताराम येच्युरी यांच्या स्मृतीस अभिवादन!

आरमोरीच्या शहीद भगतसिंग चौकात डावी व महाविकास आघाडीची मानवंदना,

आरमोरी; (गडचिरोली)
येथील शहीद भगतसिंग चौकात माजी खासदार दिवंगत कॉम्रेड सिताराम येच्युरी यांच्या निधनावर डावी व महाविकास आघाडीच्या वतीने श्रद्धांजली सभा घेऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी राज्यसभा खासदार कॉम्रेड सिताराम येच्युरी यांचे (ता. १२ सप्टेंबर) गुरुवारी दिल्ली येथे निधन झाले. सीताराम येच्युरी हे भारतीय राजकारणातील एक दिग्गज नेतृत्व होते. त्यांच्या राजकीय चळवळीतून शोषित, पीडित, विस्थापित, मागास व अन्याय्यग्रस्तांच्या न्याय्यहक्क लढ्याने समाज व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जाण्याची झलक निरंतर दिसून येत होती. त्यांनी आपल्या जीवनातील राजकीय वाटचाल विद्यार्थी दशेपासून सुरूवात केली होती. त्यांचा राजकीय क्षेत्रातील आर्थिक विषयांवरचा दांडगा अभ्यास होता. राष्ट्रीय पटलावर विविध पक्षातील दिग्गज नेतृत्व त्यांच्याशी देश पातळीवरच्या समस्यांवर विस्तारित चर्चा करत असत. त्यांच्या मुत्यू मुळे डाव्या विचारसरणीची मोठी हानी झाली आहे. मुत्यु नंतर त्याचा देह एम्स रुग्णालयात दान करण्यात आले.

आदरांजली कार्यक्रम प्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. डॉ. महेश कोपुलवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) चे संदिप ठाकुर, कॉग्रेस पक्षाचे डॉ.आशिस कोरेटी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे
शुभम पाटील, नितीन भोवते, प्रशांत खोब्रागडे, मिनाक्षी सेलोकर, योजना मेश्राम, अंकुश गाढवे, सांरग जाबुळे, श्रीकांत आतला, भगवान राऊत, किशन राऊत, जियाअली खान, डाव्या व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.