चिकणीच्या त्या दंगलखोरांना कोणत्या राजकीय पक्ष, पुढाऱ्यांचे पाठबळ?

दंगलीची धग विजविण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून समाज प्रबोधनाची अपेक्षा!

नेर;(यवतमाळ)
तालुक्यातील तीन ते साडेतीन हजार लोकवस्तीचे चिकणी डोमगा हे गाव आहे. या गावात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व डॉ आंबेडकरांच्या विचाराधारेवर सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगतीची वाटचाल करणारा समाज तर दुसरीकडे शिक्षणापासून कोसो दूर, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा परंपरेच्या गर्द छायेत व्यसनाधीन दारूच्या आहारी गेलेला व दारू विक्रीच्या अवैध व्यवसायात गुंतलेला समाज आहे. या दोन समाजात क्षुल्लक कारणाने झालेल्या वादाने दंगलीचे स्वरूप प्राप्त केले असून, दंगलखोरांना कोणाचे राजकीय पाठबळ तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशावेळी दंगलीची धग विजविण्यासाठी जिल्हा पालक मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून दंगलखोर समाजाचे शासन, प्रशासन स्तरावरून सामाजिक प्रबोधन करण्याची अपेक्षा नागरिकांमधून केली जात आहे.

एका लग्न समारंभात (ता.१५ सप्टेंबर) रविवारी दारू पिऊन एकाने गोंधळ घातल्यावरून गावातील दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी रात्री ३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लग्नात मद्यधुंद सुनील बाबुलाल राठोड याने गोंधळ घातला होता, वरात चिकणी गावात पोहचल्यावर त्याला मिलिंद पंडित मेश्राम यांनी समाज देऊन घरी पोहचविले. मात्र सुनील राठोड याने त्याच्या समाजातील पुढाऱ्यांना लग्नातील वऱ्हाड्यांनी त्याला मारहाण केल्याची खोटी बतावणी केली, यावरून त्या गटाने लाठ्या काठ्यांनी लग्न समारंभ ठिकाणी जाऊन वऱ्हाड्यांवर हल्ला चढविला. यावेळी दोन्ही गटात हाणामारी झाली,

या प्रकरणात मिलिंद मेश्रामच्या तक्रारीवरून सुनील बाबुलाल राठोड (३५), कांतीलाल बाबुलाल राठोड (३५), अजय मोतीलाल राठोड (२८), ज्ञानेश्वर फुलसिंग राठोड (२८), संजय दिलीप चव्हाण (२७), जितेश दिलीप चव्हाण (२५), सौरव इंदल राठोड (२५), भूषण संजय राठोड (२७), नयन हिम्मत राठोड (२७), जीवन मोतीलाल राठोड (२७), अभिषेक मोतीलाल राठोड (२०), महेश अनिल राठोड (२५), सोमेश्वर फुलसिंग राठोड (२७), चेतन सुरेश राठोड (२६), मनीष दादाराव राठोड (२४), संदेश दादाराव राठोड (२०), रोहित अनिल जाधव (२२) सर्व रा. चिकणी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), १९१ (२), १९१ (३), १९०, ३५२, ३५१ (२) (३) नुसार गुन्हा दाखल केला. तर गौरव इंदल राठोड याच्या तक्रारीवरून मिलिंद मेश्राम (३१), प्रशांत शामराव घरडे (३५), किशोर केशव वानखेडे (५०), नीलकमल उत्तम बोरकर (४५) विकास लक्ष्मण कापशीकर (४३), प्रद्युम्न विलास शेंडे (२५), विलास विनायक चंदनखेडे (३०), नितीन तेजराव सुखदेवे (३५), रवी धनराज देशभ्रतार (२७), निरंजन माधव मेश्राम (५०), भूषण जयवंत भगत (२१), भूषण परमानंद बांबोर्डे (२७), लक्ष्मण हिरामण कापशीकर (६०), धीरज राजू गजभिये (२३), प्रतीक निरंजन मेश्राम (२७), परमानंद सोमा बांबोर्डे (५५), रत्नरक्षित परमानंद बांबोर्डे (२२), प्रभुदास शेंडे (५५) सर्व रा. चिकणी (डोमगा) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५(२), १९१ (२), १९१ (३), १९०, ३५२, ३५१ (२) (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या घटनेमुळे चिकणी येथे तणावाची स्थिती निर्माण झाली असून. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास पोलिसांना यश आले आहे.

सदरची घटना गेली दोन दशकांपासून दारव्हा दिग्रस विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे, आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील आहे. त्यामुळे या गावातील दंगलखोरांना कोणत्या राजकीय पुढारी व पक्षाचे पाठबळ आहे? या दिशेने पोलिसांनी तपास करण्याची व मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून दंगलखोर समाजाने सामाजिक प्रबोधन होण्याची अपेक्षा नागरिकांमधून वर्तविली जात आहे. अन्यथा एका दारुड्याच्या खोटारडेपणातुन झालेल्या दंगलीने चिकणी गावातील सामाजिक एकोपा विकोपाला गेल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार गजानन पत्रे, नितेश राठोड यांच्याकडून केला जात आहे.