गंभीर अवस्थेत नागपूरच्या दवाखान्यात प्रसूती, माता व बाळ सुखरूप!
एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील धोबेगुडा गावापासून वाहणाऱ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम झालेले नसल्यामुळे, रहदारीसाठी नागरिकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. अशातच (ता.०५ ऑक्टोंबर) शनिवारी राजे मुन्शी झोरे (वय ३३) या गरोदर मातेला प्रसूतीसाठी रुगणालायत दाखल करण्यासाठी नाल्याच्या पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागला आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसुरच्या वैद्यकीय पथकाने वेळेत व तत्परतेने रुग्णवाहिका उपलब्द ठेवल्यामुळे मातेची नागपुरातील रुग्णालयात सामान्य प्रसूती होऊन माता व बाळ सुखरूप आहेत.
दोन महिन्यांपूर्वी १८ जुलैला भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील गरोदर मातेला नाल्याच्या पुरामुळे जेसीबीच्या बकेटमधून जीवघेणा प्रवास करावा लागला होता, तसेच १० सप्टेंबर रोजी एटापल्ली तालुक्यातील लांजी येथील गरोदर मातेला पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला होता. या दोन्ही घटना ताज्याच असतांना. आणि जिल्ह्यात अशा आरोग्य सेवेच्या अनेक समस्यां रस्त्या अभावी घडत असतांना शासन प्रशासनाकडून मात्र ठोस उपाययोजना होतांना दिसून येत नाही, धोबेगुडा येथील गरोदर माता राजे मुन्शी झोरे ही घरी असतांना तिला (ता.०५ ऑक्टोंबर) शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास अचानक प्रसूतीच्या कळा येण्यास सुरूवात झाली. ही माहिती येथील आशा वर्कर संगीत गेडाम यांना समाजल्यावरून त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सौरभ वानखडे यांना भ्रमणध्वनीवरून कडविली होती. माहितीवरून त्यांनी तात्काळ कसनसुर प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका मागवून धोबेगुडा गावाकडे राजे झोरे या गरोदर मातेला उपचारार्थ घेऊन येण्यास निघाले होते.
धोबेगुडा गावाशेजारी नाल्यावर पुल नसल्यामुळे पुराच्या पाण्यातून रुग्णवाहिका गावापर्यंत पोहचू शकत नव्हती. त्यामुळे डॉ सौरभ वानखेडे, आरोग्य सेविका रोशनी बेसरा, आशा वर्कर संगीता गेडाम यांनी गावकऱ्यांच्या मदतीने कसेबसे त्या गरोदर मातेला घेऊन पुराच्या पाण्यातून पायी चालत दीड किमी प्रवास करून दुसऱ्या तीरावरील रुग्णवाहिके पर्यंत पोहचविण्यात आले होते. यावेळी नाल्याच्या पलीकडे रुग्णवाहिका असल्याने आणि नाला पाण्याने भरून वाहत असल्यामुळे त्या गरोदर मातेला नाला ओलांडतांना जीवघेणा प्रवास करावा लागेल आहे.
एकीकडे प्रसुती कळा सुरू असल्याने असाह्य वेदना आणि दुसरीकडे जीवघेणा प्रवास अश्या परिस्थितीत कसेबसे आरोग्य पथक व नातेवाहिकांचा मदतीने त्या गरोदर मातेला नाला ओलांडून रुग्णवाहिकेत बसविण्यात आले. धोबेगुडा नाल्यावरून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात तिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. मातेची प्रकृती गंभीर असल्याने तिला प्रथम अहेरी, नंतर गडचिरोली व त्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले सुदैवाने (ता.०६) रविवारी सकाळी दरम्यान तिची प्रसूती सामान्यतः झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. प्रसूती नंतर माता व बाळ सुदृढ असून राजे व नवजात मुलीची तपासणी करून उपचार केले जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन कन्नाके यांनी “जनकत्व” न्युज नेटवर्कला सांगितले आहे.