एकाच दोरीला गळफास लावून प्रेमी युगलांची आत्महत्या.

शेत शिवारातील झोपडीत आढळले दोघेही मृतावस्थेत,

मुलचेरा;(गडचिरोली)
तालुक्यातील लक्ष्मीपुर येथील एका शेत शिवारातील झोपडीच्या आड्याला एकच दोरखंड बांधून जयदेव मिलन मंडल (वय २०) रा. लक्ष्मीपूर व अमेला अमित रॉय (वय १८) रा. विजयनगर या प्रेमी युगलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

हे दोन्ही युवक, युवती रविवारी (६ ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास लक्ष्मीपूर गावालगत असलेल्या धानाच्या शेतातील झोपडीत एकाच दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले, त्या नागरिकांनी ही माहिती जयदेब मंडल यांचे नातेवाहिक व गावकऱ्यांना सांगितली होती. त्यामुळे गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

सदर घटनेची माहिती पोलिसांनाही कडविण्यात आली, मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून जयदेब मंडल व अमेला रॉय या दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे.

अमेला अमित रॉय ही मुलगी विजयनगर येथील रहिवासी असून ती बारावीत शिकत होती. तर, जयदेब मिलन मंडल हा बारावीनंतर शिक्षण सोडल्याचे कळते. अमेला मध्यरात्री घरून बाहेर पडल्याची माहिती समोर येत आहे. विजयनगर व लक्ष्मीपूर या दोन गावातील अंतर पाच किमीचे असून अमेला ही (ता.०५) शनिवारी रात्री दरम्यान राहत्या घरून निघून गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जयदेब व अमेला यांचे गळफास लावलेले मृतदेहच आढळून आले आहेत. या दोघांनीही गळफास लावून आत्महत्या केल्याचे करण अस्पष्ट असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश विधाते यांचे नेतृत्वात मुलचरा पोलिसांकडून केला जात आहे.