राजे अम्ब्रिशरावांच्या उमेदवारीसाठी दोन राष्ट्रीय पक्ष पदाधिकारी सरसावले?

महायुतीचे डॉ धर्मरावबाबा व महाविकास आघाडीच्या भाग्यश्री आत्राम यांच्या उमेदवारीला नापसंतीचा सूर!

अहेरी;(गडचिरोली)
विधानसभा निवडणुकीच्या रंगात वाढली असून सत्ताधारी महायुतीकडून नामदार डॉ धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. तर महाविकास आघाडीकडून त्यांचीच जेष्ठ कन्या माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. मात्र महायुतीचा प्रमुख राष्ट्रीय पक्ष भाजप व महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्ये कार्यकर्त्य अपक्ष उमेदवार दाखल करण्याचा तयारीत असलेले भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्र राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची विजयश्री खेचून आणण्यासाठी सरसावले असल्याची जोरदार चर्चा केली जात आहे. त्यामुळे अहेरी विधानसभेची निवडणूक रंगतदार घोण्याची चिन्ह दिसून येत आहे.

मागील विधानसभा निवडणूक २०१९ च्या रणधुमाळीत सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेऊन, आदिवासी समाजाच्या हक्काची जल, जंगल व जमिन रक्षणाच्या मुद्यावर डॉ धर्मरावबाबा आत्राम यांना माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांच्या विरुद्ध घवघवीत मताधिक्य मिळून ते राज्य विधानसभेत आमदार म्हणून पोहचले होते, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलवून स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याच्या प्रश्नावर गेली पाच वर्षापासून सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे विकासात्मक फायदे जनतेला सांगून, मंत्री आत्राम हे प्रकल्पाच्या समर्थानात उभे झाले आहेत. यावेळी त्यांची मुलगी साडे चार वर्षे त्यांच्या समर्थानात सोबत होती हे विशेष!

आता निवडणुकीच्या तोंडावर मंत्री धर्मरावबाबा आत्राम व त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यात राजकीय द्वंद्व होऊन वडील मंत्री धर्मरावबाबा यांच्या विरुद्ध दंड थोटाऊन महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेतली आहे. मात्र या दोन्ही पितापुत्रीवर भाजप, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकरत्ये व मतदार नागरिक नाराज असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळेच अपक्ष उमेदवारी दाखल करणारे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची राजकीय ताकद वाढतांना दिसून येत आहे.

अहेरी विधानसभा निवडणूकीत आदिवासी व पारंपरिक वन निवासी मतदारांकडून जल, जंगल, जमीन बचाव व लोहखनिज उत्खनन विरोधातील आंदोलन हा कळीचा मुद्दा आहे. अशा आंदोलनातील आदिवासी समाज व ग्रामसभांच्या समर्थानात उतरणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनतेने नेहमीच झुकते माप देऊन विजयी केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ नामदेव किरसान यांनी या मुद्द्यांना समर्थन दर्शविल्याने त्यांना ग्रामसभांच्या पाठबळावर भराघोष मताधिक्य घेऊन लोकसभेत खासदार म्हणून जाण्याची संधी प्राप्त झाली आहे, हे मात्र नक्की!

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे पारडे भाजप व काँग्रेस सारख्या बलाढ्य पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे जळ होतांना दिसून येत असून, सामान्य मतदारांचाही पाठींबा वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे अहेरी विधानसभेच्या निवडणुकीत राजे अम्ब्रिशराव हे अभूतपूर्व मताधिक्य घेऊन निवडणूक जिंकण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तविली जात आहे.