जोरदार शक्ती प्रदर्शन, जाहीर भाषणातून विरोधक उमेदवारांवर तीव्र प्रहार!
अहेरी;(गडचिरोली) विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांची झालेली अधोगती, वाढलेली बेरोजगारी, रस्त्यांची दुरवस्था व नागरिकांना मूलभूत हक्क, अधिकार मिळवून देण्याच्या मुद्द्यांना घेऊन तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी आणि जनतेच्या उद्धारासाठी राजे अम्ब्रिशराव ही विधानसभा निवडणूक लढवीत असल्याची घोषणा त्यांनी जाहीर सभेतून केले आहे. यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉ धर्मरावबाबा व महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे.
(ता. २८ ऑक्टोबर) सोमवारी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत राणी रुख्मिनी महल येथून भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला, राजे अम्ब्रिशराव यांचे वडील दिवंगत राजे सत्यवानराव महाराज व आजोबा दिवंगत राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या यांच्या स्मृतींना अभिवादन करून उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी जोरदार फटकेबाजी करून महायुतीचे उमेदवार मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी बोलतांना गेल्या पाच वर्षात अहेरी विधानसभा क्षेत्राला खड्ड्यात टाकून मला तिकीट मिळू नये म्हणून बाप लेकीने मला कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांकडून करोडोची रक्कम मोजून तिकीट खरेदी केली गेली असून पैश्याची उधळण करत ही निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ही निवडणूक आता जनतेनी आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे तिकीट मिळाल्याच्या आनंदात त्यांनी कितीही फटाके फोडले, जनतेचे फटाके निवडणूक निर्णयाच्या दिवशी आमच्या बाजूने दिसून येईल, असेही राजे अम्ब्रिशराव यांनी म्हटले आहे. सुरजागड लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीच्या भरवश्यावर अथोनात पैशाच्या बळावर माझ्या कार्यकर्त्यांना धमकावून ही निवडणूक जिंकणार असे त्यांना वाटत असेल तर जनता त्यांचा पैसा व धमकीचा भीक घालणार नाही, त्यामुळे ही निवडणूक भ्रष्ट नेत्यांच्या प्रतिष्ठेची नाही तर, जनसामाण्यांना त्यांचा हक्क मिळवून देणारी व त्यांच्या पाल्यांचे भविष्यासाठी घडविण्यासाठी असून त्यासाठीच मी ही निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीत भ्रष्ट व गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना योग्य धडा शिकवा असेही आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. यावेळी राजमाता राणी रुख्मिनीदेवी, युवा नेते अवधेशरावबाब आत्राम, विक्कीबाबा आत्राम व राजे अम्ब्रिशराव समर्थक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जनता हीच माझी तिकीट आणि चिन्ह!
जनतेचे पाठबळ व समर्थनाचा धसका घेऊन माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मला कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळू नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. मला विजयी होण्यासाठी कुठलाही पक्ष आणि पक्षाचे चिन्हांची गरज नाही. माझी जनता हीच माझी तिकीट अन चिन्ह आहे. जनतेचा आशीर्वादाने मिळणाऱ्या भराघोष मतांनी मला विधिमंडळ गाठणे सोपे होणार आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम व त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी कितीही पैसा व पॉवरचा वापर करून माझ्या कार्यकर्त्यांना धमक्यांनी मला रोखण्याचा प्रयत्न केला, तरी ‘मै झुकेगा नही साला’ असा डायलॉग मारून त्यांनी विरोधकांना एक मोठे आव्हान दिला आहे.!