ग्रामसभा समर्थीत नितीन पदा यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

अहेरी विधानसभेत पहिल्यांदाच ग्रामसभा उमेदवाराची एन्ट्री,

अहेरी;(गडचिरोली)
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जल, जंगल, जमिनीच्या रक्षणाचा मुद्दा घेऊन अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड व मुलचरा अशा पाच तालुक्याच्या आदिवासी पारंपरिक ग्रामसभांच्या समर्थानातुन नितीन पदा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नितीन पदा यांनी (ता. २८ ऑक्टोबर) सोमवारी आपल्या असंख्य चाहते व समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अहेरी यांच्याकडे दाखल केला आहे, पदा यांना अहेरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड व मुलचरा अशा पाचही तालुक्यातील गाव ग्रामसभांचा पाठींबा असून त्यांच्या प्रचारासाठी नागरिकांकडून स्वयंपूर्तीने वर्गणी करून निवडणूक खर्च केला जाणार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगात येणार आहे.

महाविकास आघाडीच्या भाग्यश्री आत्राम, महायुतीचे धर्मरावबाबा आत्राम, अपक्ष राजे अम्ब्रिशराव आत्राम, मनसेचे संदीप कोरेत, ग्रामसभेचे नितीन पदा व अन्य काही अपक्ष अशा उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. नितीन पदा यांची उमेदवारी दाखल करतांना कोतुराम पोटावी, देविदास मटामी, मधुकर पोटावी, महादेव पदा, विलास नरोटे, राजेश नैताम, शिवाजी मटामी सुधाकर गोटा, चंदू मटामी, आकाश मटामी, सुनील मडावी, चित्तरंजन दास, शिवाजी नरोटे, लालसू नागोटी, सनकु पोटावी, गणेश मटामी, विशाल नरोटे, रमेश नरोटे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.