आध्यात्मिक गायत्री परिवाराचे प्रचारक म्हणून सर्वत्र परिचित!
एटापल्ली; (गडचिरोली)
येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एस कोवे गुरुजी (वय ८०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. ते आध्यात्मिक गायत्री परिवाराचे प्रचारक म्हणून सर्वत्र परिचित होते.
कोवे गुरुजी यांची कारकीर्द जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ते मुख्याध्यापक अशा पदावरून ते निवृत्त झाले होते, शिक्षकी पेशा सांभाळून त्यांनी गायत्री परिवाराच्या प्रचार व प्रसार कार्यात स्वतःला झोकून दिले होते, त्यांची प्रकृती ठणठवीत असतांनाच (ता.०४फेब्रुवारी) मंगळवारी सायंकाळी सात वाजता दरम्यान राहते घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, लागलीच नातेवाहिकांनी त्यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने गायत्री परिवारातील साधक व चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कोवे गुरुजींच्या निधनाने गायत्री परिवाराच्या प्रचार व प्रसार कार्यातील एका कर्तृत्वाशील साधकाची उणीव कधीही भरून निघणार नाही अशा भावना त्यांच्या चाहत्यांवर्गातून व्यक्त केल्या जात आहेत.
ज्ञानेशवर कोवे गुरुजी यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यसंस्कार (ता. ०५ बुधवारी) सकाळी अकरा वाजता दरम्यान डुम्मे नाला मोक्षधाम घाटावर केला जाणार आहे.