कावीळ या आजाराने ग्रस्त होते, उपचारा दरम्यान झाला मृत्यू,
एटापल्ली;(गडचिरोली)
येथील साऊथ इंडियन हॉटेल चालक शब्बीर इब्राहिम कुट्टी शेख (वय ४७) यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले, ते गेली काही महिन्यांपासून कावीळ या आजाराने ग्रस्त होते.
कावीळ आजाराने ग्रस्त शब्बीर कुट्टी यांची प्रकृती बिघडल्याने (ता. ०४) मंगळवारी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, येथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने ( ता. ०५) बुधवारी त्यांना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले होते, मात्र प्रकृतीत कोणत्याही प्रकारची सुधारना न होता, प्रकृती खालावत जाऊन (ता. ०६) गुरूवारी सकाळी सात वाजता उपचारा दरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. शब्बीर कुट्टी यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन विवाहित व एक अविवाहित अशा तीन मुली दोन जावई, नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार आहे, दपणाविधी आज शुक्रवार सायंकाळी पाच वाजता दरम्यान गाव तलाव शेजारच्या मुस्लिम कब्रस्थानमध्ये केला जाणार आहे.