जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करपनफुंडी येथे होते कार्यरत.
एटापल्ली; (गडचिरोली)
तालुक्यातील बुर्गी येथील रहिवासी प्राथमिक शिक्षक लालू सोमाजी डोनारकर (वय ५२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करपनफुंडी येथे कार्यरत होते.
शिक्षक लालू डोनारकर यांना (ता. ०९ फेब्रुवारी) रविवारी रात्री आठ वाजता दरम्यान बुर्गी येथे राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला, यावेळी नातेवाहिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचारार्थ दाखल केले, लागलीच डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करून उपचार सुरू करण्यात आले, मात्र डोनारकर यांची प्रकृती खालावत जाऊन रात्री दहा वाजता दरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले.
शिक्षक लालू डोनारकर हे अविवाहित होते, त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचा बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यविधी (ता १०) सोमवारी सायंकाळी तीन वाजता दरम्यान त्यांचे जन्म गाव बुर्गी येथील स्मशानभूमीत केले जाणार आहे.