अजब दुनियेचा गजब नजराणा अबुजमाड!

पोलादी भूभाग, हाडे गोठविणारी थंडी, घनदाट जंगल, नैसर्गिक सौंदर्याचा अप्रतिम ठेवा!

अबुजमाड; (नारायणपूर)
छत्तीसगड राज्यातील नारायणपूर, दंतेवाडा, सुखमा या तिन्ही जिल्ह्याचा भूभाग तसेच महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला आदिवासी बहुल प्रदेश म्हणून ख्यातनाम असलेला अबुजमाड प्रांत नैसर्गिक साधन संपत्ती व सौंदर्याने नटलेला असून, इथे अतिमागास माडिया आदिवासी समाज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हर्षोउल्हासात वास्तव्य राहत आहेत.

पोलादी भूभाग, हाडे गोठविणारी थंडी, घनदाट जंगल, नैसर्गिक सौंदर्याचा अप्रतिम ठेवा अशा भरगच्च वैभव निसर्गाने अबुजमाड प्रदेशाला दिला आहे. सदरचा भाग नक्षली प्रभावाखाली येत असल्याने इथे मुक्त विहार अथवा पर्यटन करण्यास धजावत नाही, मात्र जगाच्या पाठीवरील दोन ते तीन मोठमोठ्या देशांत नसले इतकी जागतिक दर्जाची खनिज संपदा एकट्या अबुजमाड प्रदेशात आहे, हे मात्र नक्की!

गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध सुरजगडे लोहखनिज पहाडीला लाजवेल अशा पन्नासहून अधिक लोहखनिज डोंगर, बारमाही भरभरून वाहणारे नदी व नाले, विविध प्रकारचे औषधी गुणधर्म असणारे वनस्पती, चौफेर घनदाट जंगल, नदी व नाले वाहतांना डोंगराळ भागातून नैर्गिक तयार झालेले धबधबे, अशा निसर्ग वैभवात इथेले वातावरण नित्य थंडगार असते, वृक्षावल्लीमध्ये सुगंधित उद (धूप) ची वृक्ष सर्वाधिक आहेत. उद संकलानातून स्थानिक रहिवासी आदिवासी नागरिकांना मोठा रोजगार उपलंब होतो. हे विशेष!

त्यामुळे या प्रदेशाला उटी म्हणावे, की कुल्लू मनाली, काश्मीर म्हणावे की, दार्जिलिंग, हे जाचे त्यानेच ठरवावे! अशा या वैभव संपन्न प्रदेशात भारतातील अतिमागास माडिया जमातीचे नागरिक अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवनमान हर्षउल्हासत जगतात हे मात्र नसावे थोडके!

म्हणूनच अजब दुनियेचा गजब अबुजमाड प्रदेश! अप्रतिम सौंदर्याचा अजरामर नजराणा आहे!