एक मार्च शनिवारी भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन,
गडचिरोली;
येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनांच्या सहभागाने (दिनांक ०१मार्च) शनिवारी धरणे आंदोलन केले जाणार आहे. सदरचे आंदोलन महाबोधी बौद्धविहाराचा ताबा बौद्ध धर्मियांना देण्याच्या मागणीसाठी बुद्धगया (बिहार राज्य) येथे सुरू असलेल्या पूज्य बौद्ध भिक्षूंच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शविण्यासाठी केले जाणार असून आंदोलनात बहुसंख्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
देशातील विविध धार्मिक स्थळांचा ताबा संबधित धार्मिक संस्था अथवा समाजाकडे असून बुद्धगया महाबोधी विहार मात्र बौद्धांच्या ताब्यात नाही. त्यामुळे गेली पन्नास वर्षाहुन अधिक काळापासून भारतातील बौद्ध समाज आणि पूज्य बौद्ध भिक्षू संघाच्या वतीने सातत्याने आंदोलने उभारून ताबा व हक्काची मागणी केली जात आहे. इतक्या वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने, महाबोधी बौद्धविहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी समग्र भारतीय पूज्य बौद्ध भिक्षुनी तीन आठवड्यांपूर्वी (दिनांक १२ फेब्रुवारी) पासून बुद्धगया येथे भव्य धरणे आंदोलन सुरू केले आहे. सदरच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी गडचिरोली येथे (दिनांक ०१ मार्च) शनिवारी भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनांच्या सहभागातून भव्य धरणे आंदोलन केले जाणार आहे.
सदर धरणे आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा, संविधान फाउंडेशन, सम्यक समाज समिती, पंचशील बौद्ध समाज मंडळ, प्रबुद्ध बुद्ध विहार, प्रबुद्ध विचार मंच, विशाखा महिला मंडळ, बौद्ध समाज मंडळ, त्रिशरण महिला मंडळ, संबोधी बुद्ध विहार समिती व बौद्ध बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.