एसटी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष पदी अजय कंकडालवार यांची निवड!

सचिव म्हणून एस व्ही कुमरे व कार्याध्यक्ष संतोष गेडाम यांची वर्णी!

अहेरी; (गडचिरोली)
येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी आगार कष्टकरी जनसंघाची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली असून अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सचिव पदी एस व्ही कुमरे व कार्याध्यक्ष म्हणून संतोष गेडाम यांची वर्णी लागली आहे.

राज्याच्या दुर्गम, अविकसित व मागास भागाचे आगार म्हणून अहेरी आगारची ओळख आहे. (दि.१२ मार्च) मंगळवारी एसटी कष्टकरी जनसंघाची सभा माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली घेऊन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले आहे.

यावेळी कष्टकरी जनसंघ ए.एल.सी. कार्यासन/१७/११६३५ DT१९/SEP/२०२५ साठी अहेरी आगार कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अजयभाऊ कंकडालवार आगार सचिव एस व्ही कुमरे, कार्यध्यक्ष संतोष गेडाम, उपाध्यक्ष हेमत पुल्लीवार, सहसचिव महादेव कोडपे, कोषाध्यक्ष निर्मला सिंहम, कार्यक्षम उपाध्यक्ष दिपक कोरेत, संघटक सचिव कपिल टेकाम, अजय मुळावार, प्रसिध्दी प्रमुख प्रफुल कन्नाके, चंदू कूळयेटी, सल्लागार प्रमुख आशिष पुंगाटी, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे, सदस्य म्हणून तुकाराम लोणे, गुरु तिम्मा, उमेश चांदकर, संजय कुळसंगे, सचिन दडमल, तुलशी पोरतेट दयाराम राणे, श्यामल मंडल, व हिरा मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी व कामगाराच्या न्याय हक्कासाठी एसटी आगार कष्टकरी जनसंघ निरंतर तत्परतेने काम करत असतो, या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी एक धडाडीचे नेते काँगेस अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या जात असून संपूर्ण कार्यकारिणीचे सर्वत्र अभंनंदन केले जात आहे.(जनकत्व दि.१४ मार्च २०२५)