एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील आलदंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आलेल्या मार्टिन मिखाई तिग्गा ( वय ४५) व नानेश मादी गावडे (वय २५ ) या दोन्ही दुचाकी स्वारांचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन दोघेही जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आलदंडी गावाजवळ घडली आहे. अपघातग्रस्त दोघांच्याही चेहरा चपला गेला असल्याने सुरवातीला मृतकांनी ओळख झाली नव्हती, मात्र त्या दोघांच्या खिशातून मिळालेली आधार कार्ड व काही कागदपत्रांवरून ते पंदेवाही या गावचे रहिवासी असल्याची ओळख पटली आहे.
सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतांना (दि.१४ एप्रिल) सोमवारी सायंकाळी पाच वाजता दरम्यान मार्टिन तिग्गा व नानेश गावडे हे दोघे पंदेवाही गावातील एका लग्न समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी सुरजागडवरून पंदेवाहीकडे एम एच ३३ झेड ९२६४ क्रमांकाच्या दुचाकीवरून जाणारे मार्टिन तिग्गा व नानेश गावडे हे दोन इसम परत येत असतांना दुचाकीला सुरजागड लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली, यात दोन्ही दुचाकीस्वार ट्रकच्या चाकात येऊन त्याचे शरीर चंदामेंदा झाले, यात ते दोघेही जागीच ठार झाले आहेत. घटना स्थळावर मृतकांच्या रक्ताचा पडलेला सडा सुरजागड लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या कंपनी प्रशासनाकडून पाणी टाकून धुवून स्वच्छ करण्यात आले असून अपघाताचा पुरावा नष्ट करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. हे विशेष!
गेली दहा वर्षात सुरजागड लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांच्या अपघातात अनेक नागरिकांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र सुरजागड लोहखनिज प्रकल्पाला शासन व प्रशासनाचे पाठबळ असल्याचे बोलल्या जात असून, अपघातात ठार होणाऱ्यांची मातीमोल किंमत आहे. घटनेच्या माहितीवरून आलदंडी पोलिसांनी ट्रक जप्त करून ट्रक चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती असून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे पाठविण्यात आला आहे. अपघाताच्या घटनेची सखोल चौकशी दोषींवर कडक कारवाही करण्याची मागणी मृतक मार्टिन तिग्गा व नानेश गावडे यांच्या परिवाराने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नातेवाहिकांनी दिला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.