साडीचा गळफास लावून इसमाची आत्महत्या.

एटापल्ली;(गडचिरोली)
तालुक्यातील पिपली बुर्गी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोरेनार येथील गोलू शंकर एक्का (वय ३७) याने राहत्या घराच्या आडयाला पत्नीच्या वापरातील साडीचा गळफास लागून आत्महत्या केल्याची उघड झाले आहे.

गोलू शंकर एक्का हा कोरेनार येथे कुटुंबासह राहून मोलमजुरीचे कामे करत होता. परिसरात सध्या मोहफुले संकलनाची कामे सुरू आहेत. (दि.१४ एप्रिल) सोमवारी गोलूची पत्नी व नातेवाहिक शेत शिवारात मोहफुले संकलनासाठी गेले होते. घरी कोणीही नसल्याची संधी साधून गोलु एक्काने दुपारी एक वाजता दरम्यान पत्नीच्या वापराच्या साडीच्या साह्याने गळफास तयार करून आत्महत्या केली, ही बाब घराशेजारील नागरिकांच्या लक्षात आली. नागरिकांनी घटनेची माहिती पिपली बुर्गी पोलिसांना कडविण्यात आली आहे.

गोलू एक्का याने गळफास लावून केलेल्या आत्महत्याचे कारण स्पष्ट झाले नसून नातेवाहिकांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून गोलू एक्का याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठीं ग्रामीण रुग्णालयात एटापल्ली येथे पाठविला आहे. मृत्यू पश्चात गोलू एक्का यांना पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पिपली बुर्गी पोलिसांकडून केला जात आहे.