एटापल्ली; (गडचिरोली)
येथील जिल्हापरिषद समूहनिवासी प्राथमिक शाळात पीएमश्री स्टुडंट्स बूक डेपो अँड स्कूल स्टेशनरीचे उदघाटन केंद्र प्रमुख अरुणा बार्लावार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा शाळेतच पूर्ण करता याव्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थी बूक डेपो अँड स्कूल स्टेशनरीची निर्मिती करण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पातून साकारण्यात आला आहे, सदरच्या प्रकल्पांतर्गत एटपल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद समूहनिवासी शाळेची निवड करण्यात आली होती, त्यामुळे (दि. ०५ मे) सोमवारी स्टुडंट्स बूक डेपो अँड स्कूल स्टेशनरीचे मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले असून बुक डेपो व स्टेशनरीचा लाभ एटापल्ली केंद्रातील चौदा ते पंधरा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी होणार आहे.
यावेळी शाळाव्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अंतकला मडावी, मुख्याध्यापक लेकामी, उपक्रमशील शिक्षिका कु टेकुलवार, रेखा सिंग समितीचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक प्रामुख्याने उपस्थित होते.