चंद्रपूर जिल्ह्यातील या तहसीलदाराने युवकाला दिला आधार

3 वर्षानंतर मिळाला युवकाला आधार

News34 chandrapur गुरू गुरनुले

 

मुल :— मुल येथील कार्तीक कोटलवार उज्जैन, मध्यप्रदेश राज्यात 6 वर्षाचे असतांना आई, बाबा लहान असतानाच मरण पावले त्यामूळे आधार कार्ड काढण्यासाठी कार्तीकला कसलाही कागदोपत्री शासकीय पुरावा म्हणून मिळत नव्हता स्वगावी कार्तीक परत आल्यानंतर त्याला आधार कार्डची नितांत गरज पडली अशावेळी त्यांने मुल येथील कर्तव्य दक्ष तहसीलदार डॉ.रविंन्द्र होळी हयांना कार्यालयात भेटून आपली आपबीती कथन ​केली व आधार कार्ड काढण्यासाठी विनंती केली.

कार्तीक कोटलवार यांना 23 वर्षानंतर नवीन आधार कार्ड प्राप्त झाल्यांने त्यांनी तहसिलदा डॉ.रविंन्द्र होळी यांचे आभार मानले आहे.

केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये नागरीकांना काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कारण, सरकारने या योजनांचा लाभ घेणाऱ्या लोकांना आधार कार्ड काढणे बंधनकारक केले आहे.आधार कार्ड आता नागरिकांसाठी अत्यावश्यक आहे. शासकीय योजना असो किंवा बँकेमध्ये आधार कार्ड द्यावे लागते. असे असले तरी जिल्ह्यातील तब्बल दोन लाखांवर नागरिकांचे आधार कार्ड अजूनही अपडेट नसल्याची बाब समोर आली आहे.

प्रत्येक नागरिकांना आपले आधारकार्ड अपडेट करणे महत्त्वाचे आहे. १० वर्षांपूर्वी काढलेल्या आधार कार्ड ऑनलाइन अद्यावतीकरण करणे गरजेचे असून शासनाने आधार अपडेट करण्याच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत. ज्या नागरिकांनी अद्यापही आधार अद्यावतीकरण केले नाही, अशा नागरिकांनी तत्काळ ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आधार कार्डवरील पत्ता, मोबाइल क्रमांक, अपडेट असणे आवश्यक आहे.

तहसिदार डॉ. रविंन्द्र होळी यांनी कार्तीकला आधार कार्ड काढण्यासाठी राजपत्रीत अर्ज चा वापर करून तहसील कार्यालयातील आधार संचालक पराग खोब्रागडे यांना पाचारण करून राजपत्रीत अर्जचा वापर करून कार्तीक कोटलवार याला आधार कार्ड काढण्यासाठी सहकार्य करण्यास सांगीतले. व आधार कार्डची शासकीय प्रकिया पूर्ण करून कार्तीक कोटलवार याला बायोमॅटीक नविन आधारकार्ड 10 दिवसात प्राप्त झाले.

​कार्तीक कोटलवार यांनी मुल चे कर्तव्यदक्ष तहसिलदार डॉ. रविंन्द्र होळी व तहसील येथील शासकीय कार्यालयातील आधार संचालक पराग खोब्रागडे व आॅपरेटर मडावी यांचे व्यक्तीशा आभार मानले आहे.