खासदार धानोरकर यांच्या तब्येतीबाबत अफवेचा बाजार

अफवेचा बाजार सुरू झाला

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावल्याने 2 दिवसांपूर्वी त्यांना नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ AIR AMBULANCE ने दिल्ली येथील वेदांता रुग्णालयात नेण्यात आले.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र 29 मे च्या सकाळ पासून धानोरकर यांच्या प्रकृतीबाबत अफवेचा बाजार सुरू झाला, अनेकांनी तर चक्क शोकसंदेश समाजमाध्यमांवर टाकले, मात्र धानोरकर यांच्या कार्यालयातून महत्वाची अपडेट मिळाली आहे.

जाहीर सूचना व आवाहन

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. बाळू धानोरकर साहेब यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे समाज माध्यमावर कोणतीही अफवा पसरवू नये. शिवाय कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेवून भयभीत होऊ नये. मा. खासदारांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी प्रार्थना करूया.

खासदार बाळू धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालय, चंद्रपूर

आमदार असताना धानोरकर यांचे वेट लॉस चे ऑपरेशन करण्यात आले होते, मात्र आता त्यांना त्यामुळे आतड्यात इन्फेक्शन झाले अशी माहिती पुढे आली होती.