चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस कधी?

चंद्रपुरात पावसाचे आगमन कधी?

News34 chandrapur

Whether news

चंद्रपूर – जगात सर्वाधिक तापमानाचा फटका बसलेले चंद्रपुरातील नागरिक पावसाची वाट बघत आहे, यंदा देशात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्याची झाली होती, मात्र आता या उन्हाच्या झळा सोसलेले नागरिक आतुरतेने पाऊस कधी येईल याची वाट बघत आहे.

याबाबत हवामान खात्याने 7 दिवसांचा चंद्रपूर जिल्ह्यातील पावसाचा अंदाज काय याबाबत शक्यता वर्तविली आहे.

हा आहे अंदाज

11 जून ला अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासाहित हलक्या किंवा मध्यम सरीचा पाऊस कोसळणार, 11 ते 14 जून पर्यंत असेच वातावरण कायम राहणार, त्यानंतर 15 ते 17 जून ला जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, मात्र या ढगाळ व वादळी वाऱ्याच्या दिवसात तापमान 40 डिग्री सेलिअस च्या वर राहणार असून सध्यातरी चंद्रपूरकरांना उकड्यापासून मुक्तता मिळणार नाही.