News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल – गेल्या पाच वर्षापासून मंजूर करण्यात आलेल्या खेडी ते गोंडपिपरी राज्यमार्गाचे काम पूर्णपणे रखडल्याने त्यामार्गवरील चांदापुर, जूनासुरला, गडीसुरला, नवेगाव (भूजला), बेंबाळ, नांदगाव, गोवर्धन, दिघोरी, बोंडाळा, नवेगाव मोरे, वळुली व त्यामागील गावच्या नागरिकांना जाण्या येण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून त्रास सहन करीत आहेत.

ठेकेदाराने खोदून ठेवलेल्या खड्यात २५ जून रोजी राजगड येथील सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील मारकवार यांची ब्रीझा कार क्रमांक एम.एच 34- 7788 पलटी खाल्याने गाडीचे नुकसान झाले आहे. तूर्तास जीवित हानी टळली. हा अपघात केवळ ठेकेदाराने कोलवर खड्डे खोदून अर्धवट ठेवल्याने अनेक अपघात होत आहेत. तरी जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खेडी गोंडपीपपरी रस्त्याच्या कामाकडे विशेष लक्ष पुरवून त्वरित काम पूर्ण करावे अशी मागणी राजगड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामीण नेते राजूपाटील मारकवार यांनी केली आहे.
या रस्त्याला लागून असलेल्या अनेक गावातील स्थानिक लोक प्रतिनिधींनी काही महिन्यांपूर्वी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. काँग्रेस तर्फे एक महिन्यापूर्वी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. त्या ठिकाणी स्वतः कंत्राटदार व गोंड पिपरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी मोर्चाला सामोरे जाऊन फक्त मला दोन महिने द्या. मी पूर्ण काम करुन देतो असे शेकडो नागरिकांचे समक्ष व मुल येथील पोलिस उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांचे समोर लेखी लिहून दिले आहे. तरी सुद्धा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजूनही काम पूर्ण केलेले नाही. जर वरिष्ठ दिलेले लेखी आश्वासना नुसार दखल घेऊन काम पूर्ण केले असते तर चार दिवसांपूर्वी जूनसुरला येथील शाळेचे दोन मुलं खड्यात पडलेच नसते.
ही चूक ठेकेदारांनी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.जूनासुर्ला रोडवर दहा फूट रुंद व तेवढेच खोल खड्डे अजूनही खोदून ठेवले असल्याने हे खड्डे गावच्या शाळेपासून अगदी ५० ते ६० मिटरवर अंतरावर आहेत. याच ठिकाणाहून शाळेचे विद्यार्थी ये – जा करीत असता दोन विद्यार्थी खड्यात पडले आणि आता चक्क चार चाकी कार पडली याला जबाबदार कोण असा असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील मारकवार यांनी केला आहे.
बांधकाम विभाग गोंडपिप्रीचे उपअभियंता व चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता व मान.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांनी या महत्वाच्या गंभीर प्रश्नाकडे विशेष लक्ष पुरऊन ठेकेदाराकडून अर्धवट असलेले काम पूर्ण करावे, अन्यथा परत रस्त्यावर उतरून जनतेला रास्ता रोको आंदोलन करावे लागेल असा इशारा राजू पाटील मारकवार यांनी जनतेच्या वतीने दिला आहे. सध्या शेतीचे हंगाम सुरु झाले असून खेडी गोंडपिपरी रस्त्यावर पाईप टाकण्यासाठी खड्डे खोदून ठेवल्याने जूनासुरला, गडीसुरला, नवेगाव (भूजला), बेंबाळ, चांदापुर, नांदगाव, गोवर्धन, दिघोरी, बोंडाळा, नवेगाव मोरे, वळुली या मार्गावरील शेतकऱ्यांचे कामे अडून पडले आहे. पाऊसाचे दिवस असल्याने अर्धवट काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सुद्धा राजू पाटील मारकवार यांनी केली आहे.