चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यूचे तांडव

भीषण अपघात

News34 chandrapur

 

सावली – चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील व्याहाड खुर्द.येथील रोहनकर पेट्रोल पंप समोर ट्रक ला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाला ,यात तीन युवकांना आपला जीव गमवावा लागला तर तीन युवक जखमी झालेले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथे 3 मुले वर्धा नदीत बुडाली

नांदगाव येथील मजूर गोसेखुर्द च्या पाईप लाईन कामासाठी किसाननगर येथे मुक्कामाने राहत असून कामानिमित्त व्याहाड खुर्दच्या दिशेने जात होते, तर हिरापुर येथील युवक गडचिरोलीला कामानिमित्त जाऊन आपल्या स्वगावी हिरापुर येथे परत येत असताना, चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय मार्गावरील व्याहाड खुर्द येथील रोहनकार पेट्रोल पंप समोर ट्रक ला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन दुचाकी स्वारांची समोरा समोर जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच तर एकाच उपचारा दरम्यान मृत्यू झाला.३ जण गंभीर जखमी झालेले आहेत. दोन्ही दुचाकीवर तीन तीन व्यक्ती बसले होते असे सांगितले जात आहे.

 

हरीश पांडुरंग सहारे वय 35 रा. नांदगाव तालुका सिदेवाही, सागर रघुनाथ शेडमाके वय 22, राहणार हिरापुर, प्रशांत आत्राम वय 30 वर्ष रा. हिरापूर तालुका सावली मृत्यू पावले तर जखमींमध्ये अजय विजय गोरडवार वय 32 वर्षे रां सावली व सुमित शेडमाके हिरापूर व प्रशांत चावरे नांदगाव गंभीर जखमी आहे.

 

जखमीना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेले असून घटनेची माहिती सावली पोलीसांना देण्यात आली सावली पोलिस पुढील कार्यवाही करीत आहेत. गावातील तरुणाच्या अपघाती निधनामुळे हिरापुर आणि नांदगावात शोककळा पसरली आहे.